मुंबई: तंदुरुस्त राहण्यासाठी निरोगी जीवनशैली खूप महत्त्वाची आहे. त्याचबरोबर उन्हाळ्यात वाढत्या तापमानाबरोबर आपल्या आहाराचीही विशेष काळजी घ्यायला हवी. कारण उन्हाळ्यात आपल्या शरीराचं तापमानही वाढू लागतं. त्याचबरोबर शरीरात डिहायड्रेशनचीही समस्या उद्भवते, अशा वेळी मधाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. चला तर मग जाणून घेऊया मधाचे सेवन कसे करावे?
उन्हाळ्यात ताकाचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरते. हे शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर याचे सेवन केल्याने पचनसंस्थाही निरोगी राहते, पण जर तुम्ही ताकामध्ये मध मिसळून प्यायले तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण ताकामध्ये मध मिसळून प्यायल्याने स्मरणशक्ती वाढते.
लिंबाच्या पाण्यासोबत मधाचे सेवन करणे फायदेशीर ठरते. कारण उन्हाळ्यात लिंबूपाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते. पण जर तुम्ही लिंबूपाण्यात मध घातले तर ते तुमच्यासाठी अधिक फायदेशीर आहे, कारण लिंबूपाण्यात मध मिसळून प्यायल्याने तुमचे शरीर थंड राहते आणि उन्हाळ्याच्या हंगामात तुम्हाला उष्माघाताची समस्या होत नाही.
उन्हाळ्याच्या हंगामात दुधात मध मिसळून सेवन करणे हा एक आरोग्यदायी पर्याय आहे. जर आपण साखर सोडण्यासाठी निरोगी पर्याय शोधत असाल तर मध आणि दुधाचे मिश्रण सर्वोत्तम सिद्ध होऊ शकते. दुधात मधाचे सेवन केल्याने पचनक्रिया चांगली होते.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)