मुंबई : कोरोना (corona) आणि त्यानंतर लागलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम द्यायला सुरुवात केली. त्यानंतर वर्क फ्रॉम होमचं (Work From Home) कल्चरचं सुरु झालं. एकाच जागेवर आठ तास बसून काम करणं. अनेकांना सुरुवातीला हे चांगलं वाटलं. घरी बसून काम केल्यानं सुरुवातीला लोकांनी त्याचा मरमुराद आनंद घेतला. मात्र, त्यानंतर कंटाळा येऊ लागला. अनेकांना लठ्ठपणाचा त्रास होऊ लागला. तर अनेकांनी वैतागून वैतागून कार्यालयात जाऊन काम करायला सुरुवात केली. कारण, जास्त वेळ लॉपटॉपसमोर राहिल्यानं शरीराचं मोठं नुकसान होऊ शकतं. याचा परिणाम देखील अनेकांना जाणवला. खासगी क्षेत्रातील अनेक कंपन्यानी कोरोना कमी झाल्यानंतरही वर्क फ्रॉम होमचा पर्याय खुला ठेवला आहे. तर अनेक ठिकाणी सक्ती करण्यात आली आहे. मात्र, याचा आरोग्यावर परिणाम होत असल्यानं कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना समोरं जावं लागतंय.
वर्क फ्रॉम होम म्हणजे एकाच जागेवर बसून काम करणं. सलग एकाच जागेवर बसून काम केल्यानं शरीराची हलचाल होत नाही. यानं शरीर जाड होण्याची शक्यता असते, वजन वाढू लागतं. एकाच जागेवर बसल्यानं ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलचा त्रास होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यातच अनेक समस्यांची शक्यता घरी बसून आणि त्यातही एकाच जागेवर बसून काम केल्यानं वाढते.
एकाच जागेवर बसून आठ तास काम केल्यानं लठ्ठपणा तर वाढतोच. शिवाय शरिराची हलचालही रोखली जाते. त्यातच रक्तातून कमी ग्लुकोज मिळू लागतं. यामुळे मधुमेह होण्याची शक्यता वाढते. मघधुमेहाचं नियंत्रण केलं जाऊ शकतं. पण, त्याला पूर्णपणे बरं नाही केलं जाऊ शकत. त्यामुळे या गोष्टीकडे देखील लक्षात घ्यायला हव्यात.
एका जागी बसून काम केल्यानं स्नायूंची लवचिकता हळूहळू कमी होऊ लागते. त्यानंतर स्नायूमध्ये कडकपणा येऊ लागतो. याशिवाय ग्रीवा, पाठदुखी, फ्रोझन शोल्डर आदी समस्यांचा धोकाही वाढू लागतो. चुकीच्या आसनामुळे देखील ही समस्या वाढते. त्यामुळे आपण जे काही करतो आहे. त्याचा शरीरावर किती आणि कसा परिणाम होऊ शकतो. याचा विचार करुन काम करायला हवं. तर हाडे देखील ठिसूळ होण्याची शक्यता वाढते. दिवसभर बसल्यानं हाडांवर त्याचे वाईट परिणाम होतात. तर संधिवात, ऑस्टिओपोरोसिस सारख्या गंभीर आजारांचीही समस्या वाढते. एकाच जागी बसून काम केल्यानं हार्मोनलची समस्याही होऊ शकते. त्यामुळे एकाच जागी बसत असाल तर काही वेळानं त्या जागेवरुन उठून फिरावे, यासह डक्टरांचा सल्ला घेऊन काही छोटे व्यायाम केल्यास तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता.
इतर बातम्या