जेव्हा केव्हा..कुणाची तब्येत बिघडली आणि तो डॉक्टरकडे गेला की डॉक्टर सर्वात आधी रुग्णाचे नखं (Patient’s nails) बघतात. याचे कारण नखांवरुन माणसाचे आरोग्य कळू शकते. डॉक्टर व्यतिरिक्त, आपण स्वतःची नखे पाहून देखील आरोग्याबद्दल जाणून घेऊ शकतो. नखे व्हिटॅमिनची कमतरता (Vitamin deficiency) पासून कॅन्सर पर्यंतची माहिती देऊ शकतात. नखांवर दिसणारी काही चिन्हे तुम्हाला आजारपणाबाबत काही संकेत देत असतात. असे संकेत दिसताच तुम्ही वैदयकीय सल्ला घेणे आवश्यक ठरते. जसे की, नखांभोवतीची त्वचा जर पिवळी पडली असेल तर ते थायरॉईडचे लक्षण (Symptoms of thyroid) असू शकते. थायरॉईडमुळे नखे खडबडीत, कोरडी होवुन तडे जाऊ शकतात. ‘अमेरिकन ऍकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजी असोसिएशन’च्या मते, सुजलेली बोटे, वक्र नखे, नखेच्या वरची त्वचा जाड होणे ही थायरॉईडची लक्षणे असू शकतात.
सर्वात गंभीर लक्षणांपैकी एक म्हणजे नखांवर रेषा दिसणे. नखांवर दिसणाऱ्या रेषा ‘मेलेनोमा’चे लक्षण असू शकते जे नखांच्या खाली उद्भवणाऱ्या स्कीन कॅन्सरचा प्रकार आहे. हाताच्या आणि पायांच्या बोटांमध्ये देखील ते, होऊ शकते. नखांवर दिसणाऱ्या रेषांकडे लोक दुर्लक्ष करतात. मात्र ते, घातक ठरु शकते. नखामध्ये काळी किंवा तपकिरी रेषा दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांना भेटा.
युकेच्या कॅन्सर रिसर्चच्या मते, कोणताही जीवघेणा आजार झालेल्या सुमारे 35 टक्के लोकांची नखे मऊ असतात आणि नखांभोवतीची त्वचा नेहमीपेक्षा जास्त गोल असते. त्याच प्रमाणे, बोटांचा अग्रभाग सामान्यपेक्षा मोठा होतो. या अवस्थेला फिंगर क्लबिंग म्हणतात. सिस्टिक फायब्रोसिस, हृदयरोग, कर्करोग किंवा इतर अनुवांशिक रोगांसारख्या अनेक गंभीर परिस्थितींमुळे फिंगक्लबिंग होऊ शकते. तज्ञांचे मते, फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या सुमारे 80 ते 90 टक्के प्रकरणांमध्ये फिंगर क्लबिंग जबाबदार आहे.
क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, एखाद्याला सोरायसिस (त्वचा रोग) असल्यास नखे तुटू शकतात. या आजाराची इतर लक्षणे कोपर, गुडघे आणि टाळूवर देखील दिसतात. सोरायसिस ग्रस्त अर्ध्याहून अधिक लोकांमध्ये त्याची लक्षणे हात आणि पायांच्या नखांमध्ये दिसू लागतात.नखांमध्ये छिद्र पडू शकतात किंवा ती अधिक तीक्ष्ण होऊ शकतात.
जेव्हा मूत्रपिंड किंवा थायरॉईडची समस्या असते तेव्हा नखांवर आडव्या रेषा तयार होतात. यासोबतच हे जास्त ताप, कोविड, कांजण्या, गोवर किंवा न्यूमोनियामुळे देखील होऊ शकते. जे लोक त्यांच्या आहारात पुरेसे प्रथिने आणि झिंक घेत नाहीत त्यांच्या नखांमध्ये आडव्या रेषा दिसतात. ही स्थिती एक्जिमा किंवा सोरायसिसचा दुष्परिणाम देखील असू शकते.
पिवळे आणि जाड नखे मधुमेहाचे लक्षण आहेत. मधुमेह असलेल्या लोकांची नखे पिवळी आणि जाड होतात. मधुमेह असलेल्या लोकांमध्ये ही लक्षणे खूप आधीपासून नखांवर दिसू लागतात.