नवी दिल्ली: भारतातील आघाडीची औषध कंपनी झायडस कॅडिलाच्या (Zydus Cadila ) कोरोनाच्या लसीवरील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. झायडस कॅडिलाच्यावतीनं केंद्र सरकारला येत्या 7 ते 8 दिवसांमध्ये लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यासाठी अर्ज करणार असल्याचं सांगितलं आहे. झायडस कॅडिलाच्या वतीनं झायकोव-डी (ZyCov-D) लसीची निर्मिती करण्यात आली आहे. (Zydus Cadila will apply for emergency authorisation for ZyCov-D corona vaccine in next 7-8 days)
झायडस कॅडिलानं डीएनए आधारित कोरोना लसीची निर्मिती केली आहे. आपात्कालीन वापरासाठी अर्ज करणारी झायडस कॅडिला ही दुसरी कंपनी आहे. तर, डीएनएवर आधारित असणारी कोरोनावरील जगातील पहिली लस आहे. या लसीमध्ये विषाणच्या डीएनएच्या जेनेटिक कोडचा वापर करुन लसीची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे लस घेतल्यानंतर व्यक्तीची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल.
Zydus Cadila likely to seek emergency authorisation for ZyCoV-D COVID-19 vaccine in 7-8 days
Read @ANI Story | https://t.co/3CCwQOwTWU pic.twitter.com/M04S9q1sCF
— ANI Digital (@ani_digital) June 18, 2021
निती आयोगाचे सदस्य वी.के.पॉल यांनी झायडस कॅडिलाकडे कोरोना लसीची चाचणी करण्यासाठी तीन टप्प्यात 28 हजार स्वयंसेवकांनी चाचणीसाठी नोंदणी केल्याची माहिती दिली. झायडस कॅडिला लवकरच त्यांनी कोरोना लसीच्या चाचणीसाठी करण्यात आलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष आमच्याकडे सादर करेल, असं वी.के.पॉल म्हणाले. आम्हाला झायकोव-डी पासून अधिक अपेक्षा आहेत, असं देखील ते म्हणाले आहेत.
भारत सरकारनं आतापर्यंत आपत्कालीन वापरासाठी तीन कोरोना प्रतिबंधक लसींना मंजुरी दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड, भारत बायोटेकची कोवॅक्सिन, रशियाच्या स्पुतनिक वी लसीला मंजुरी देण्यात आली आहे.
झायडस कॅडिलाच्या लसीचे तीन डोस घ्यावे लागणार आहेत. पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस 28 व्या दिवशी तर तिसरा डोस 56 व्या दिवशी घ्यावा लागणार आहे. झायडस कॅडिलाकडून दोन डोसबाबात संशोधन सुरु आहे.
संबंधित बातम्या:
पुण्यातही लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी होणार, ‘नोव्हाव्हॅक्स’च्या लसीची ‘सीरम’कडून ट्रायल
कोरोना कधी होऊन गेला कळलंही नाही; नागपुरात लहान मुलांमध्ये आढळल्या अँटिबॉडिज
(Zydus Cadila will apply for emergency authorisation for ZyCov-D corona vaccine in next 7-8 days)