रशियाचे 1 हजार सैनिक मारले; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा दावा,ओस्कोल नदीवरचा पूल जमीनदोस्त करुन संपर्क तोडला

| Updated on: Feb 25, 2022 | 8:58 PM

मुंबईः Russia-Ukraine War: युक्रेनच्या (Ukraine) संरक्षण मंत्रालयानेय चालू असलेल्या युद्धजन्य परिस्थिबाबत एका गोष्टीची खुलासा केला आहे की, आतापर्यंत रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये झालेल्या युद्धात (War) रशियाचे 1000 सैनिक मारले गेले आहेत. याआधी सकाळाच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले की, रशियाचे सैनिक युक्रेनच्या राजधानीत घुसले असून त्यांनी त्या परिसराला घेरले आहे. रशियाने गेल्या काही तासांपासून युक्रेनवर […]

रशियाचे 1 हजार सैनिक मारले; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा दावा,ओस्कोल नदीवरचा पूल जमीनदोस्त करुन संपर्क तोडला
1 thousand army
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबईः Russia-Ukraine War: युक्रेनच्या (Ukraine) संरक्षण मंत्रालयानेय चालू असलेल्या युद्धजन्य परिस्थिबाबत एका गोष्टीची खुलासा केला आहे की, आतापर्यंत रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये झालेल्या युद्धात (War) रशियाचे 1000 सैनिक मारले गेले आहेत. याआधी सकाळाच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले की, रशियाचे सैनिक युक्रेनच्या राजधानीत घुसले असून त्यांनी त्या परिसराला घेरले आहे. रशियाने गेल्या काही तासांपासून युक्रेनवर क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा चालू केला आहे. त्यानंतर युक्रेनमधील संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, या संघर्षात आतापर्यंत 1,000 पेक्षा जास्त सैनिक मारले गेले आहेत. अशी माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेनीही दिली आहे.

या युद्धजन्य परिस्थितीत रशियाचे सैनिकाकडून युक्रेनवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे, रशियन सैनिक ज्या प्रकारे युक्रेनमध्ये घूसत आहेत आणि त्यांच्याविरुद्ध जे युक्रेनचे सैनिक लढण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि या रशियन सैनिकांना थोपवण्यासाठी युक्रेनच्या सैनिकांनी एक पूल उडवून दिला आहे.

युक्रेनवर चहूबाजूंनी हल्ला

युक्रेनवर होत असलेला हल्ला हा एकाच बाजूने होत नाहीत तर चहूबाजूंनी हल्ला करण्यात येत आहे. आणि युक्रेनला घेरण्यासाठी म्हणून रशियानेही सगळ्या योजना आखून ठेवल्या आहेत. त्यामुळे रशियन सैनिकांना रोखण्यासाठी म्हणून ओस्कोल नदीवर पूल युक्रेनच्या सैनिकांनी नदीवरचा पूल उद्ववस्त केला आहे.

रशियन सैन्यांचा राजधानीला वेढा

याआधी सकाळी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले होते की, रशियाचे सैन्य युक्रेनच्या राजधानीत दाखल झाले तर त्याचवेळी, सुमीच्या गव्हर्नरने म्हटले आहे की, रशियन सैन्याने संपूर्ण परिसराला वेढा दिला आहे तर युक्रेनच्या गृहमंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले की, राजधानी कीववर पहिला क्षेपणास्त्र हल्ला क्रूझ किंवा बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने करण्यात आला. त्यावेळी मोठा असा आवाज आला, तर युक्रेनने असा दावा केला आहे की, आम्ही दोन रशियन क्षेपणास्त्रे पाडली आहेत.

युक्रेन पूर्णपणे एकाकी

रशियन सैन्याने सकाळी अवघ्या 40 मिनिटांत कीववर 36 क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा अमेरिकन सिनेटरने केला आहे. या युद्धात युक्रेन पूर्णपणे एकाकी पडले असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाविरुद्ध युद्ध करणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धात अमेरिका आपले सैन्य पाठवणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

युक्रेनचे जगाकडे मदतीसाठी याचना

युक्रेनमधील नागरिक जगाकडे मदत मागत असून निष्पाप लोकांचा यामध्ये बळी जात आहे. जेव्हा रोम जळत होतं तेव्हा निरो फिडेल वाजवत होता अशी एक जुनी म्हण आहे त्या म्हणीचा आता प्रत्यय येत आहे कारण युक्रेन जळत आहे, आणि अमेरिका निर्बंधाची वीणा वाजवत आहे. अमेरिका महासत्ता असूनही आता ती पुतिनसमोर मात्र लोटांगण घालत शरण गेली असल्याची टीका होत आहे.

संबंधित बातम्या

युद्धाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या कुरापतीः तैवानच्या हवाई हद्दीत चीनची फायटर जेट;रशिया-युक्रेन युद्धाचा चीन राजकीय फायदा उठवणार?

Russia Ukraine : तिरंगा हाती धरला अन् विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण, पहिली तुकडी रोमानियाच्या बॉर्डरकडे रवाना

Russia Ukraine War : शरणागतीशिवाय चर्चा नाही, रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांनी यूक्रेनचा प्रस्ताव फेटाळला!