इराणवरील हल्ल्यात कुठलीही चूक होऊ नये, यासाठी इस्रायलने आपल्या घातक शस्त्रांचा अत्यंत अचूकतेने वापर केला. इस्रायलने अत्यंत बारकाईने या हल्ल्याचा प्लानिंग केलं होतं. इस्रायलने या हल्ल्यासाठी आपल्या शक्तीशाली, सर्वोच्च फायटर जेट्सचा वापर केला. इस्रायलने जिवीतहानी होणार नाही, याची काळजी घेतली. त्यांनी फक्त इराणच्या लष्करी तळांना लक्ष्य केलं. इराणच लष्करी खच्चीकरण करणं हेच त्यांचं उद्दिष्ट्य होतं. जी प्लानिंग केली, त्यानुसारच इस्रायलने कारवाई केली. इस्रायलने इराणवर हल्ल्यासाठी 100 फायटर जेट्स वापरली. पण ही फायटर जेट्स एकाचवेळी वापरली नाही. त्यांनी तीन टप्प्यांमध्ये हल्ले केले. ही कारवाई कशी केली ते समजून घ्या. इराणने 1 ऑक्टोंबरला इस्रायलवर जवळपास 200 मिसाइल्स डागली होती. हमास आणि हिज्बुल्ला चीफच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराणने हा मिसाइल हल्ला केलेला.
इस्रायलने त्याचवेळी हल्ल्याला प्रत्युत्तर देणारं हे स्पष्ट केलं होतं. त्यानुसार इस्रायलने मध्यरात्री 2.30 च्या सुमारास इराणवर पहिल्यांदाच थेट हल्ला चढवला. इस्रायलने F-35 फायटर जेटने हल्ला केला. या फायटर विमानाच वैशिष्ट्य म्हणजे ते रडारला सापडत नाही. त्यानंतर F-15 इगल, F-16 या विमानांचा वापर केला. इस्रायली एअर फोर्सने या हल्ल्यासाठी 2000 किलोमीटरचा प्रवास केला. ‘रॅमपेज’ हे लांब पल्ल्याच सुपरसॉनिक मिसाइल आणि ‘रॉक्स’ हे नेक्स्ट जनरेशन हवेतून जमिनीवर हल्ला करणारं मिसाइल वापरलं.
इतकी फायटर विमान वापरण्यामागे रणनिती काय होती?
इराणमधील मिसाइल आणि ड्रोन निर्मिती करणाऱ्या 20 टार्गेट्सना लक्ष्य करण्यात आलं. एकूण तीन लाटांमध्ये हा हल्ला करण्यात आला. पहिल्या लाटेत इराणच्या रडार आणि एअर डिफेन्स सिस्टिमला आंधळ केलं. म्हणजे त्यांना हल्ल्याची तीव्रता आणि हल्ला कुठून होतोय हे समजणार नाही. दुसऱ्या लाटेत मिसाइल आणि ड्रोन निर्मिती करणाऱ्या कारखान्यांवर हवाई हल्ला केला. एकावेळी 25 ते 30 च्या ग्रुपने मिळून इस्रायली फायटर जेट्सनी हल्ला केला. 10 जेट्सनी समन्वय साधून मिसाइल हल्ला केला. एकाचवेळी इतकी फायटर विमान वापरली त्यामागे कव्हर देण्याची आणि दिशाभूल करण्याची रणनिती होती.