भारताचा आणखी एक शत्रू ढगात, हाफिज सईद याच्या साथीदाराला गोळ्या घातल्या; पाकिस्तानातच थरार

| Updated on: Oct 01, 2023 | 1:58 PM

मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लष्कर ए तोयबाचा दहशतवादी हाफिज सईद याला लागोपाठ दुसरा झटका बसला आहे. हाफिज सईदच्या मुलाची हत्या झाल्यानंतर सईद याच्या सर्वात जवळच्या साथीदाराचीही हत्या झाली आहे.

भारताचा आणखी एक शत्रू ढगात, हाफिज सईद याच्या साथीदाराला गोळ्या घातल्या; पाकिस्तानातच थरार
hafiz saeed
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कराची | 1 ऑक्टोबर 2023 : मुंबईवरील हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईद (Hafiz Saeed) याला लागोपाठ दुसरा झटका बसला आहे. आधी हाफिज सईदचा गायब झालेला मुलगा कमालुद्दीन सईद याची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. आता त्याचा अत्यंत जवळचा साथीदारही यमसदनी गेला आहे. सईदचा अत्यंत खास असलेल्या मुफ्ती कैसर फारुखी याची हत्या करण्यात आली आहे. काही लोकांनी मुफ्ती कैसरवर गोळीबार केला. दिवसाढवळ्याच मुफ्ती कैसर याचा गेम करण्यात आल्याने हाफिज सईदला मोठा झटका बसला आहे. पाकिस्तानसाठीही ही हादरवणारी घटना आहे. तर मुफ्ती कैसरच्या रुपाने भारताच्या आणखी एका शत्रूचा खात्मा झाला आहे.

मुफ्ती कैसर फारख हा भारत विरोधी कारवाया करणारी दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाचा सह संस्थापक होता. तो लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफिस सईद यांचा निकटवर्तीय होता. पाकिस्तानच्या कराची शहरात अज्ञात व्यक्तीने त्याची गोळ्या घालून हत्या केली. मुफ्ती कैसर हा रस्त्यावरून पायी जात होता. तेवढ्यात समोरून काही लोक आले आणि त्यांनी मुफ्ती कैसरवर गोळ्यांचा वर्षाव सुरू केला. त्यात तो जखमी झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. रुग्णालयात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. तर, हल्लेखोरांनी मुफ्ती कैसरचा गेम केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला.

तपास सुरू

मुफ्ती कैसरवर कुणी हल्ला केला? त्याची हत्या का करण्यात आली? याची काहीच माहिती समोर आलेली नाही. तसेच कोणत्याही दहशतवादी संघटनेने किंवा कोणत्याही ग्रुपने त्याच्या हत्येची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मुफ्ती कैसरला ठार करण्यामागे अज्ञात लोकांचा हेतू काय होता? याचा तपास करण्यात येत आहे. मुफ्ती कैसर यांच्या मृत्यूमुळे हाफिज सईदला मोठा झटका बसला आहे. हाफिज सईदच्या अनेक कारवायात मुफ्ती कैसरचा सहभाग होता. आधी मुलगा आणि आता जवळचा साथीदार गेल्याने हाफिज सईद कोलमडून गेल्याचंही सांगण्यात येत आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये थरार

मुफ्ती कैसर फारुखच्या हत्येचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. या फुटेजमधून सर्व काही स्पष्ट होताना दिसत आहे. मुफ्ती कैसर रस्त्यावरून चालत जाताना दिसत आहे. त्याने अंगात सफेद कुर्ता आणि पायजमा घातलेला आहे. एका ठिकाणी तो थांबतो. त्यानंतर पाठीमागून एक काही बाईक स्वार येतात आणि त्याच्यावर गोळ्या घालून निघून जातात. यावेळी मुफ्ती कैसर स्वत:चा बचाव करतानाही दिसत आहे. मात्र, एक गोळी लागल्यानंतर तो खाली कोसळल्याचं या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

सर्वात मोठा झटका

या आधी कराचीतच हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी जिया उर रहमान याची हत्या झाली होती. त्यानंतर हाफिज सईद याचा मुलगा कमालुद्दीन सईद गायब झाला होता. त्याचं अपहरण झाल्याचं सांगितलं जात होतं. पेशावरमध्ये त्याचं अपहरण झालं होतं. त्यानंतर कमालुद्दीनचा मृतदेह पेशावर नजीकच्या जब्बा घाटीत आढळून आला होता. हाफिजसाठी हा सर्वात मोठा झटका होता.