काठमांडू | नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री मोठा भूकंप झाला. 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने नेपाळमध्ये मोठ नुकसान झालय. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, भूकंपामुळे नेपाळमध्ये आतापर्यंत 129 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो लोक या भूकंपात जखमी झाले आहेत. नेपाळमध्ये एका महिन्यात तिसऱ्यांदा इतके तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नेपाळच्या जजरकोट जिल्ह्यात लामिडांडा भाग भूकंपाचा केंद्र आहे. लामिडाडामध्ये 92 जणांचा मृत्यू झालाय. रुकुम जिल्ह्यात 37 नागरिकांनी प्राण गमावले आहेत. नेपाळमधील या भूकंपाचे धक्के दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक भागात जाणवले. रात्री 11 वाजून 32 मिनिटांची जसे भूकंपाचे धक्के जाणवले, लोक लगेच आपल्या घराबाहेर पळाले. सर्वत्र दहशतीच वातावरण होतं. लोक घाबरले होते. दिल्ली, यूपी, बिहार उत्तर भारतातील अनेक राज्यात भूकंपाचे हे धक्के जाणवले.
नेपाळमध्ये भूकंपामुळे आतापर्यंत 129 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मोठ्या प्रमाणात लोक जखमी झालेत. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. भूकंपामुळे अनेक घर जमीनदोस्त झाली आहेत. जजरकोटची लोकसंख्या 1 लाख 90 हजार आहे. इथे मोठ नुकसान झालय. मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. नेपाळचे पंतप्रधान पुष्प दहल प्रचंड यांनी भूकंपाच्या घटनेवर दु:ख व्यक्त केलय.
नेपाळमध्ये एका महिन्यात तिसरा मोठा भूकंप
नेपाळमध्ये मागच्या महिन्याभरातील भूकंपाचा हा तिसरा धक्का आहे. मागच्या महिन्यात दुपारी 2 वाजून 51 मिनिटांनी 6.2 रिश्टर स्केल तीव्रेतेच्या भूकंपाच्या धक्क्यामुळे नुकसान झालं होतं. आता 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यामुळे मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झालीय. नेपाळमध्ये 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला, तेव्हा बझांग भागातील चैनपूरमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू होता. नेपाळमध्ये भूकंपामुळे भूस्खलन आणि घर कोसळली आहेत. दिल्ली, एनसीआर, उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र झटके जाणवले.
#earthquake
Reports that some houses have been destroyed in #Jajarkot #Nepal due to the 6.4 scale #earthquakes. Rescue operations have been started.
Due to the #Tremor #Felt locals of some parts of Nepal have taken to the streets. #StaySafe #NepalEarthquake #DelhiNCR #Paink pic.twitter.com/EOE1HbuaNZ— Bharat Verma 🇮🇳 (@Imbharatverma) November 3, 2023
त्यावेळी 9000 नागरिकांचा झालेला मृत्यू
नेपाळच्या जाजरकोट जिल्ह्यात भेरी, नालगड़, कुशे, बेरकोट आणि छेडागडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. जिल्ह्यातील मशीनरी मदत आणि बचाव कार्यासाठी लावण्यात आली आहे. 2015 साली नेपाळमध्ये 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. यात 9000 नागरिकांचा मृत्यू झाला होता. नेपाळ असा 11 वा देश आहे, जिथे सर्वाधिक भूकंप होतात.