Saudi Arabia Temple | सौदी अरेबिया (Saudi Arabia) येथील वाळवंटात एका सर्वेक्षणादरम्यान करण्यात आलेल्या उत्खननात एक प्राचीन दगडी मंदिर (Temple) आणि वेदी सापडले आहे. तिथे सुमारे 8 हजार वर्षांपूर्वीचे मानवी वसाहतींचे अवशेषही सापडले आहेत. एकेकाळी किंडा या राज्याची राजधानी असलेल्या अल-फॉ या शहरामध्ये हा शोध लागला आहे. अल-फॉ हे (Al-Faw), Al-Rub’ Al-Khali (दि एंप्टी क्वाटर) या नावाच्या एका वाळवंटाच्या काठी वसले होते. हे Wadi Al-Dawasir पासून दक्षिणेकडे 100 किलोमीटर दूर अंतरावर आहे. saudigazette.com.sa यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल-फॉ येथे सौदी अरेबिया हेरिटेड कमिशनच्या वतीने एक बहुराष्ट्रीय टीम (Multi National Team) सर्वेक्षणासाठी गेली होती. तेथे त्यांनी खोलवर उत्खनन करत सर्वेक्षण केले असता, त्यातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.
हे सर्वेक्षण आणि त्यासाठी करण्यात आलेले उत्खनन यामध्ये सापडलेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हजारो वर्षांपूर्वीचे प्राचीन मंदिर आणि वेदीचे काही भाग. अल-फॉ येथील नागरिक येथे धार्मिक विधी करत असत, असे मानले जाते. अल-फॉ येथील पूर्वेकडील भागात सापडलेले प्राचीन दगडी मंदिर , माऊंट तुवैकच्या एका बाजूस असून त्याचे नाव कशेम कारियाह, असे आहे. तसेच 8 हजार वर्षांपूर्वीच्या नवपाषाण काळातील मानवांच्या वसाहतीचे अनेक अवशेषही येथे सापडले आहेत. त्याशिवाय वेगवेगळ्या काळातील 2,807 कबरीही या ठिकाणी मिळाल्या.
अल-फॉमध्ये जमिनीखालीही अनेक धार्मिक शिलालेख सापडले असून त्यातून त्याकाळातील लोकांच्या धार्मिक आकलनाबाबतीतही बरीच महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणातून अल-फॉच्या भौगोलिक रचनेबद्दलही महत्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत.
सौदी अरेबिया हेरिटेड कमिशनच्या वतीने करण्या आलेल्या या अभ्यासातून, सिंचन प्रणाली बद्दलही बरीच माहिती मिळाली आहे. येथील स्थानिकांनी पाण्याच्या टाक्या, कालवे या व्यतिरिक्त या पावसाचे पाणी शेतापर्यंत पोहोचावे, यासाठी शेकडो खड्डेही खोदले होते. जगातील सर्वात कठीण वाळवंटात लोक पावसाचे पाणी कसे वाचवत असत, हे गुपित या शोधाद्वारे उलगडले आहे.
माऊंट तुवैक येथील दगडांवरील कलाकृती (आर्टवर्क) आणि शिलालेख कोरलेले आहेत. त्याद्वारे Madhekar Bin Muneim या नावाच्या इसमाची कथा सांगण्यात आली आहे. त्याशिवाय प्रवास, शिकार आणि युद्धाची माहितीही त्या दगडांवरील कलाकृतींमधून मिळते. सौदी अरेबियाचा वारसा जाऊन घेऊन तो जतन करण्यासाठी हेरिटेज कमिशनद्वारे हे उत्खनन व सर्वेक्षण करण्यात आले आहे. आणखी नव-नवीन गोष्टी शोधण्यासाठी अल-फॉ येथे हे संशोधन आणखी काही काळ सुरूच राहणार आहे.