शॉपिंग मॉलमध्ये घुसून दिसेल त्याला गोळ्या घातल्या, 9 जण जागीच ठार; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

| Updated on: May 07, 2023 | 9:13 AM

टेक्सास येथील एका मॉलमध्ये अज्ञात हल्लोखोराने बेछुट गोळीबार केला. त्यात नऊ लोक जागीच ठार झाले आहेत. तर सातजण जखमी झाले आहेत. हल्लेखोरांना पोलिसांनी ठार केलं आहे. मात्र, या हल्ल्याने अमेरिकेत एकच खळबळ उडाली आहे.

शॉपिंग मॉलमध्ये घुसून दिसेल त्याला गोळ्या घातल्या, 9 जण जागीच ठार; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
texas mall violence
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

टेक्सास : अमेरिकेच्या टेक्सासमधील एलन येथील डलास मॉलमध्ये अज्ञात बंदूकधारींनी अंधाधूंद गोळीबार केला. हे बंदूकधारी मॉलमध्ये घुसले आणि त्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. दिसेल त्याला गोळी घालण्यास सुरुवात केल्याने मॉलमध्ये एकच खळबळ उडाली. या गोळीबारात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. या गोळीबारात सातजण जखमी झाले आहेत. स्थानिक वेळेनुसार 3.40 वाजता हा गोळीबार झाला. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन या हल्लेखोरांना कंठस्नान घातल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

एलन येथील एलन प्रीमियम आऊटलेट्स मॉलमध्ये शनिवारी ही घटना घडली. एलन पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवरून या हल्ल्याची माहिती दिली आहे. तसेच पोलीस घटनास्थळी असल्याचंही सांगितलं आहे. सध्या या गोळीबाराची चौकशी सुरू असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

व्हिडीओ व्हायरल

या हल्ल्याचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गोळीबार सुरू होताच लोक मॉलमध्ये घाबरून पळताना दिसत आहेत. लोक शॉपिंग मॉलच्या पार्किंगमध्ये आश्रय घेताना दिसत आहेत. तर बॅकग्राऊंडला गोळीबाराचे मोठमोठे आवाज ऐकायला येत आहेत. मीडिया रिपोर्ट्स नुसार एलन प्रीमियम आऊटलेट डलासच्या उत्तरेकडील एक आऊटडोअर मॉल आहे.

 

असा झाला हल्ला

ब्रेसन जोन्स हा या हल्ल्याचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. त्याने या हल्ल्याची माहिती दिली. स्पोर्ट्स आऊटलेट स्टोअरमध्ये आपली शिफ्टसाठी पोहोचला होता. तो त्याच्या कारमध्ये बसला होता. तेव्हा 20 राऊंडहून अधिक फायरिंगचा आवाज झाला. त्याने लोकांना अचानक दुकानातून बाहेर पळताना पाहिलं. एक अनोळखी माणूस त्याच्या कारच्या दिशेने आला. त्याने कारचा दरवाजा उघडालाय सांगितला. त्यानंतर त्या माणसााल घेऊन जोन्स कारमधून तात्काळ तिथून निघून गेले. त्यामुळे दोघांचा जीव वाचला.

 

लहान मुलांचाही मृत्यू

दरम्यान, या हल्ल्यानंतर पोलिसांनी या परिसरात जाण्यास नागरिकांना मज्जाव केला आहे. बंदूकधारी एकटेच होते. त्यांनी अचानक मॉलमध्ये फायरिंग सुरू केली. मात्र, पोलिसांनी त्यांना कंठस्नान घातलं आहे. या हल्ल्यातील जखमींना सिटी हेल्थकेअरमध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे. यात पाच वर्षापासूनच्या मुलापासून ते 61 वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठांचा समावेश आहे. या हल्ल्यात लहान मुलांचा मृत्यू झाल्याचंही सांगितलं जात आहे.