Israel – hamas war : इस्रायलच्या सैनिकांडून मोठी चूक झाली आहे. शुक्रवारी तीन ओलिसांना धोका समजून सैनिकांनी त्यांना गोळ्या घालून ठार केले. पण ते इस्रायलचेच नागरिक असल्याचं समोर आले आहे. 7 ऑक्टोबरला हमासच्या ठिकाणांवर कारवाई करताना तीन ओलीस ठेवण्यात आलेल्या बंधकाना धोका असल्याचं समजून सैनिकांनी ठार केले. त्यामुळे आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर टीका होऊ लागली आहे. बेंजामिन नेतान्याहू यांच्या विरोधात लोकं रस्त्यावर उतरली आहेत. घटनेची माहिती मिळताच लोकांनी लष्करी तळाकडे मोर्चा वळवला. उर्वरित ओलीसांच्या सुटकेसाठी तडजोड करण्याची मागणी लोकांकडून होऊ लागली आहे. हमासने अनेकांना ओलीस ठेवले आहे. अजूनही 100 हून अधिक ओलीस हमासच्या ताब्यात आहेत.
बेंजामिन नेतन्याहू यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण इस्रायल शोक करत आहे. या कठीण प्रसंगी माझे हृदय शोकाकुल कुटुंबांसोबत आहे.”
लष्कराने एका निवेदनात म्हटले की, कारवाई दरम्यान हे तिनही लोकं एकतर सूटका करुन पळाले किंवा त्यांना हमासनेच सोडले असावे. पण धोका असल्याचे चिन्ह दिसल्याने त्यांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. या दु:खद घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करतो. या गंभीर घटनेतून तात्काळ धडा घेण्यात आला आहे.
व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा पथकाने शुक्रवारी गाझामध्ये इस्रायली सैन्याने तीन ओलीसांची चुकून हत्या केल्याची माहिती दिली. ते दुःखद आहे,”
7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यादरम्यान हमासने सुमारे 250 लोकांचे अपहरण करून त्यांना ओलीस ठेवले होते. या हल्ल्यात 1,139 लोकांचा मृत्यू झाला होता. हमासने म्हटले की, इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल हल्ल्यात 18,700 हून अधिक लोक मारले गेले आहेत.