कटेनिया- इटलीतील एक 36 वर्षांचा व्यक्ती कोरोना, (Covid)मंकीप़ॉक्स (Monkey pox)आणि एचआयव्हीने (HIV)एकाचवेळी संक्रमित झाल्याची घटना समोर आली आहे. कटेनिया युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनुसार ही जगातील पहिली घटना आहे. एखाद्या व्यक्तीला तिन्ही आजार होण्याची ही पहिलीच घटना मानण्यात येते आहे. ही व्यक्ती स्पेनला गेलेली असताना त्याला हे तिन्ही आजार एकत्र झाल्याची माहिती आहे. दुसऱ्या काही पुरुषांशी असुरक्षित संबंध ठेवल्यामुळे हा प्रकार झाल्याची माहिती आहे. द सनच्या वृत्तानुसार, हा रुग्ण स्पेनमध्ये 16 ते 20 जूनपर्यंत होता. डोके दुखणे, गळ्यात खवखवणे, ताप या तीन लक्षणांमुळे तीन दिवसांनंतर 2 जुलैच्या सुमारास त्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. याच काळात या रुग्णाच्या हातांवर, चेहऱ्यावर आणि पायांवर पुळ्या येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर 5 जुलैला त्याला हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी डिपार्टमेंटमध्ये दाखल करण्यात आले. रिझल्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर गुप्च रोगांच्या चाचण्याही करण्यात आल्या. त्यात रुग्ण एचआयव्ही संक्रमित असल्याचेही स्पष्ट झाले. या रुग्णाला एचआयव्हीची लागण गेल्या काही काळातच झाली असल्याची माहिती आहे.
11 जुलैपर्यंत या रुग्णाच्या अंगावर आलेल्या मंकीपॉक्सच्या पुळ्या सुकल्या. त्याचा कोरोना रिपोर्टही निगेटिव्ह आला. त्या रुग्णाला आता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असून, काही दिवस विलगीकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना आणि मंकीपॉक्स हे दोन्ही आजार पुन्हा उद्भवण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे उपचारानंतर सतर्कता बाळगण्याचे गरजेचे झालेले आहे.
जगभरातील मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या 48 हजार 54 इतकी झालेली आहे. आत्तापर्यंत या आजाराचा फैलाव 102 देशांमध्ये झालेला आहे. टॉप `10 देशांमध्ये इंग्लंड, स्पेन, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, पोर्तुगाल, कॅनडा, नेदरलँड, इटली आणि ब्राझिल आहे. भारतातही मंकीपॉक्सची 10 प्रकरणे समोर आली आहेत. यातील एकाचा मृत्यूही झालेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने हा आजाराबाबत जगात आरोग्य़ आणीबाणी जाहीर केलेली आहे.