कहर…! पाकिस्तानमधील कराचीत मंदिराच्या पुजाऱ्यावर हल्ला, जमावाकडून मूर्तींची तोडफोड!

| Updated on: Jun 09, 2022 | 11:31 AM

पाकिस्तान येथील कोरंगी येथे परत एकदा अल्पसंख्याक हिंदूंना टार्गेट करण्यात आले. जमावाने हिंदू मंदिराच्या पुजाऱ्यावर हल्ला केला आहे, तसेच देवाच्या मूर्ती आणि पुजाऱ्याच्या घराची तोडफोड केली आहे. माहितीनुसार, कोरंगी येथील श्री मरी माता मंदिरावर बुधवारी रात्री उशिरा हल्ला करण्यात आलाय. श्री मरी माता मंदिराचे गेल्या काही दिवसांपासून काम सुरू आहे.

कहर...! पाकिस्तानमधील कराचीत मंदिराच्या पुजाऱ्यावर हल्ला, जमावाकडून मूर्तींची तोडफोड!
Image Credit source: tv9
Follow us on

कराची : पाकिस्तानमध्ये (Pakistan) सतत हिंदू लोकांवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या पुढे येतात. मात्र, आता तर कहरच झाला आहे. चक्क हिंदू मंदिराच्या पुजाऱ्यावरच कराचीमध्ये हल्ला करण्यात आलाय. धक्कादायक गोष्ट म्हणजे जमावाकडून हा हल्ला (Attack) करण्यात आला आहे. पुजाऱ्यावर हल्ला करूनच हा जमाव शांत झाला नाही तर पुजाऱ्याच्या घरामध्ये असलेल्या देवांच्या मूर्तींची तोडफोड देखील करण्यात आलीये. या घडलेल्या प्रकारानंतर पाकिस्तानमधील हिंदूंमध्ये अत्यंत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, इतकी मोठी घटना घडून सुध्दा पाकिस्तान पोलिसांनी (Police) अद्याप एकालाही अटक केली नाहीये.

अल्पसंख्याक हिंदू परत एकदा टार्गेटवर

पाकिस्तान येथील कोरंगी येथे परत एकदा अल्पसंख्याक हिंदूंना टार्गेट करण्यात आले. जमावाने हिंदू मंदिराच्या पुजाऱ्यावर हल्ला केला आहे, तसेच देवाच्या मूर्ती आणि पुजाऱ्याच्या घराची तोडफोड केली आहे. माहितीनुसार, कोरंगी येथील श्री मरी माता मंदिरावराच्या पुजाऱ्यावर बुधवारी रात्री उशिरा हल्ला करण्यात आलाय. श्री मरी माता मंदिराचे गेल्या काही दिवसांपासून काम सुरू आहे. यामुळे पुजाऱ्याने मंदिरातील मुर्ती आपल्या घरी आणल्या होत्या. पुजाऱ्यावर हल्ला केल्यानंतर त्यांच्या घरात असलेल्या मंदिरातील देवांच्या मुर्ती देखील जमावाने तोडल्या. हल्ला इतका गंभीर होता की, पुजाऱ्याच्या आजूबाजुला राहणाऱ्या लोकांच्या मनामध्ये देखील भिती निर्माण झालीये.

हे सुद्धा वाचा

हल्ला होऊनही अद्याप कोणालाही अटक नाही

यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, सध्या तपास सुरू आहे. इकतेच नव्हेतर या घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. ज्याठिकाणी हा हल्ला करण्यात आला, तेथे पोलिसांनी नाकेबंदी देखील केली आहे. पोलिसांना या हल्लाची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण घटनेची माहिती घेतली. या घटनेमुळे कराचीमध्ये राहणार्‍या हिंदू समुदायामध्ये घबराट आणि भीती निर्माण झालीये. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस तैनात करण्यात आले आहेत.पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदूची मंदिरे अनेकदा जमावाच्या हिंसाचाराचे टार्गेट असतात. ऑक्टोबरमध्ये सिंधू नदीच्या काठावर असलेल्या एका ऐतिहासिक मंदिराची काही लोकांनी विटंबना देखील केली होती.