कोरोनापेक्षा भीषण महामारीचा धोका! चीनमधील मुलांमध्ये पसरला नवा आजार

| Updated on: Nov 23, 2023 | 2:54 PM

कोरोनासाठी चीनला नेहमीच जबाबदार मानले जाते. आता चीनमध्ये नवीन आजाराने ग्रस्त लोक देखील आढळले आहेत. उत्तर चीनमध्ये एक वेगळ्या प्रकारचा रोग आढळून आला आहे जो मुख्यतः मुलांमध्ये दिसून येतो. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार या मुलांमध्ये श्वसन आणि न्यूमोनियाचे आजार आढळून आले आहेत.

कोरोनापेक्षा भीषण महामारीचा धोका! चीनमधील मुलांमध्ये पसरला नवा आजार
VIRUS
Follow us on

China New epidemic : कोरोना महामारीतून लोकं बाहेर आले असतानाच आता आणखी एका साथीचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनासाठी चीनला जबाबदार मानले जात आहे. त्यातच आता चीनमध्ये नवीन रहस्यमय आजाराने चिंता वाढवल्या आहेत. उत्तर चीनमध्ये एक रोग आढळून आला आहे, जो मुख्यतः मुलांमध्ये दिसून येतो. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार या मुलांमध्ये श्वसन आणि न्यूमोनियाशी संबंधित आजार आढळून आले आहेत. त्याची लक्षणे न्यूमोनियापेक्षा वेगळी आहेत. मुलांमध्ये तीव्र ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास आणि फ्लूच्या समस्या दिसून येत आहेत.

चिनी अधिकार्‍यांनी आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्याचे आवाहन केले आहे. रुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ऑक्टोबरमध्ये उत्तर चीनमध्ये गेल्या तीन वर्षांच्या याच कालावधीच्या तुलनेत इन्फ्लूएंझा सारख्या आजारांमध्ये वाढ नोंदवली गेली आहे.

WHO सक्रीय

हा आजार समोर येताच डब्ल्यूएचओही सक्रिय झाला आहे.  WHO ने चीनला यावर नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

डब्ल्यूएचओने चीनला प्रत्येक माहिती शेअर करण्याची सूचना केली आहे. एजन्सीने चीनच्या लोकांना या आजाराविरूद्ध केलेल्या उपाययोजनांचे पालन करण्यास सांगितले आहे. सर्व लोकांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी आजारी लोकांपासून अंतर राखावे, आजारी असल्यास घरीच राहावे आणि मास्क वापरावे.

न्यूमोनियाशी संबंधित बहुतेक रुग्ण हे ईशान्य चीन, बीजिंग आणि लिओनिंगमध्ये आढळत आहेत. मुलांमध्ये उच्च ताप, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण यासारखी लक्षणे असतात, जी न्यूमोनियासारखी असतात. कोरोनामध्येही अशीच लक्षणे आहेत, परंतु आतापर्यंत लहान मुले या महामारीपासून मोठ्या प्रमाणात वाचली होती.

कोविड मुलांवर नव्या स्वरूपात हल्ला करत आहे का, की चीनमुळे नवीन व्हायरस निर्माण झाला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोनाची उत्पत्ती चीनच्या वुहान मार्केट किंवा लॅबमध्ये झाली होती. असा आरोप केला जातो.

जागतिक संघटना मानतात की बहुतेक महामारी आफ्रिका किंवा आशियाई देशांतून सुरू होतात. WHO च्या रोगाच्या उद्रेकातही हे मान्य करण्यात आले.