बोस्टन – अमेरिकेत बोस्टनमध्ये (Boston)नदीवरुन जात असलेल्या ट्रेनमध्ये (Train caught fire) अचानक आग लागली. प्रवाशांना ट्रेनला आग लागल्याचे समजताच ट्रेनमध्ये एकच गोँधळ उडाला. अनेक प्रवासी (passengers)जीव वाचवण्यासाठी खिडक्यांतून उड्या मारायाला लागले. एका प्रवाशाने तर थेट नदीत उडी मारली. ही घटना झाली तेव्हा ट्रेनमध्ये सुमारे २०० प्रवासी होते. बोस्टनच्या स्थानिक वृतसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन मिस्टिक नदीवर असलेल्या पुलावरुन जात होती. त्याचवेळी रेल्वेच्या इंजिनला आग लागली. ही ट्रेन सोमरवीलला जात होती. आता या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत प्रवाशांनी आपले प्राण खिडक्यांतून उडी मारुन कसे वाचवले हे दिसते आहे. ही घटना गुरुवारी घडली असली तरी व्हिडीओ आल्यानंतर शुक्रवारी ही माहिती सगळ्यांना कळाली आहे.
Breaking: Fire Crews on scene of Orange line train fire. #boston25 https://t.co/XvIFJB3dI1 pic.twitter.com/n5tcIlQA6e
हे सुद्धा वाचा— Ted Daniel (@tvnewzted) July 21, 2022
एका महिला प्रवाशाने सांगितले की – मी खूप घाबरलेले होते. नेमकं काय घडतं आहे, हेच आम्हाला कळत नव्हतं. प्रवासी प्राण वाचवण्यासाठी इमर्जन्सी खिडक्यांतून बाहेर पडत होते. काही जणांनी तर जीव वाचवण्यासाठी नदीमध्ये उड्या मारल्या. थोड्याच वेळात आगीच्या ज्वाळांची धग आणि धुराचा वास येऊ लागला. थोड्या वेळाने डोळ्यांसमोर नुसता धूर होता. थोड्या वेळाने काही स्फोटांचे आवाजही ऐकू आले, त्यामुळे आम्ही जास्त घाबरलो. ट्रेनमध्ये आम्ही आगीच्या ज्वाळा पाहिल्या. मला वाटले की आता इथेच अडकून आपला मृत्यू होईल. तो अनुभव भयंकर होता.
ट्रेनच्या तळाशी असलेली मेटल शीट वीजेच्या संपर्कात आल्याने आग लागली असल्याची शक्यता बोस्टनच्या रेल्वे प्रशासनाने वर्तवली आहे. अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर वीज पुरवठा स्थगित करण्यात आला. त्यानंतर ट्रेन तपासणीसाठी रेल्वे यार्डमध्ये नेण्यात आली. आता आग कशी लागली याचा शोध सुरु करण्यात आला आहे. या अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
या दुर्घटनेनंतर बोस्टन मेट्रोच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न निर्माण करण्यात आला आहे. यापूर्वीही अशा घटना घडल्या होत्या. एप्रिलमध्ये एका प्लॅटफॉर्मवर ट्रेनसोबत फरफटला गेल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्याचा हात ट्रेनच्या दरवाजात अडकला होता. सप्टेंबरमध्ये एक्सलेटर खराब झाल्याने 9 जण जखमी झाले होते.