काबूल: अमेरिकेनं त्यांचं सैन्यअफगाणिस्तानमधून काढता पाय घेतल्यानंतर अवघ्या 6 दिवसांमध्ये अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा मिळवला आहे. तालिबानानं रविवारी जलालाबाद आणि काबूल शहरावर ताबा मिळवला. तालिबानाच्या सत्तेत राहण्याची मानसिकता नसलेले नागरिक मिळेल त्या मार्गानं देश सोडताना दिसत आहेत. काबूल विमानतळावर अफगाण नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्याचं समोर आलं होतं. अफगाणिस्तानच्या नागरिकांची धडपड व्हिडीओमधून स्पष्ट दिसतेय. अफगाणिस्तान सोडण्यासाठी काबूल विमानतळावरुन उड्डाण घेणाऱ्या विमानाच्या चाकाला लटकलेल्या दोघांचा उंचावरुन पडून मृत्यू झाल्याचं कळतंय. तर, काही नागरिक विमानाच्या पंख्यावर बसून जीवघेणा प्रवास करताना दिसत असल्याचं दिसतंय.
Unbelievable and tragic, two people who tied themselves to an airplane wheel falling from high as the aircraft takes off. Via @AsvakaNews#Afghanistan pic.twitter.com/PXAmCxautu
— Ali Hashem علي هاشم (@alihashem_tv) August 16, 2021
अफगाणिस्तानातील बिघडलेल्या परिस्थितीची दाहकता समोर येत आहे. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केलेल्या विमानाच्या पंख्यावर एक युवक बसला होता. विमान आकाशात झेपावल्यावर त्याचा ऊंचावरुन खाली कोसळल्याचं कळतंय. ही दाहक दृश्य तालिबानविषयीची अफगाण नागरिकांमधील भीती दाखवते.
Afghanistan’s tragedy right now in Kabul international airport: Afghan youth on the engine of American plane to leave the country. pic.twitter.com/CoTS8sq9c3
— Muslim Shirzad (@MuslimShirzad) August 16, 2021
तालिबानच्या ताब्यात अफगाणिस्तान गेल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण तयार झालंय. जो तो देश सोडण्यासाठी प्रयत्न करतोय. विमानतळावरील अफगाण नागिराकांची प्रचंड गर्दी झाल्यानं अमेरिकन लष्करानं हवेत गोळीबार केल्याचं समोर आलंय. अमेरिकेच्या लष्करानं केलेल्या गोळीबारामध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान अमेरिकेनं काबूल विमानतळाचा ताबा घेतला आहे.
अमेरिकी सैन्याने अफगाणिस्तान सोडल्यानंतर काही काळातचं तालिबानने सक्रीय होतं, अफगाणिस्तानातील बहुसंख्य शहरांचा ताबा घेतला. राजधानी काबूलसह आता अनेक शहरं तालिबानच्या ताब्यात आहेत. यानंतर सध्याचे राष्ट्रपती अशरफ गनी हे मात्र स्वत:च्या अनेक कॅबिनेट मंत्र्यांना सोबत घेऊन देश सोडून पळून गेलेत. ते तझाकिस्तानला पोहोचलेत. अशरफ गनी यांनी विश्वासघात केल्याची भावना अफगाण लोक व्यक्त करतायत. तर, अनेक नागरिक तालिबानच्या जुलमी राजवटीत राहण्यापेक्षा देश सोडण्याचा विचार करत आहेत. काबूलमधून बाहेर जाणाऱ्या विमानांमध्ये बसण्यासाठी नागरिकांची झुंबंड उडाली आहे.
इतर बातम्या:
Afghanistan Crisis citizen two people who tied themselves to an airplane wheel falling from high as the aircraft takes off