बुशपासून बायडनपर्यंत 4 राष्ट्राध्यक्ष बदलले, ट्रिलियन डॉलर खर्च, अमेरिकेला काय मिळालं? 20 वर्षांच्या अफगाण युद्धावर एक नजर
अमेरिका अफगाणिस्तानमध्ये जे युद्ध मागील 20 वर्षांपासून लढत होता त्याचा शेवट झालाय, मात्र यावर अमेरिका आनंद साजरा करताना दिसत नाहीये. आनंद तर अमेरिकेने 20 वर्षांपूर्वी ज्या तालिबानला सत्तेबाहेर घातलं ती दहशतवादी संघटनेला साजरा करत आहेत. कारण अमेरिका अफगाण सोडताना हीच संघटना पुन्हा सत्तेत आहे. त्यामुळे या 20 वर्षात अमेरिकेने काय मिळवलं असा प्रश्न उपस्थित होतोय.
1 / 10
अमेरिका अफगाणिस्तानमध्ये जे युद्ध मागील 20 वर्षांपासून लढत होता त्याचा शेवट झालाय, मात्र यावर अमेरिका आनंद साजरा करताना दिसत नाहीये. आनंद तर अमेरिकेने 20 वर्षांपूर्वी ज्या तालिबानला सत्तेबाहेर घातलं ती दहशतवादी संघटनेला साजरा करत आहेत. कारण अमेरिका अफगाण सोडताना हीच संघटना पुन्हा सत्तेत आहे. त्यामुळे या 20 वर्षात अमेरिकेने काय मिळवलं असा प्रश्न उपस्थित होतोय (US Afghanistan War 2001).
2 / 10
अमेरिकेला अफगाण युद्धात मोठ्या प्रमाणात नुकसानच सहन करावं लागलंय. अमेरिकेने युद्ध संपवत माघारी परतण्याची घोषणा केल्यानंतरही एका हल्ल्यात 13 अमेरिकी सैनिक आणि 169 सर्वसामान्य नागरिकांचा जीव गेलाय.
3 / 10
मागील 20 वर्षात अमेरिकेने ट्रिलियन डॉलर खर्च केले. यात अनेक अमेरिकन सैनिकांना आपला जीव गमवावा लागला. दरम्यानच्या काळात 4 राष्ट्राध्यक्ष बदलले. 2 दशकांआधी जॉर्ज डब्ल्यू बुश (George W. Bush) यांनी पहिल्यांदा बी-52 या युद्ध विमानांना अफगाणिस्तानमधील अल-कायदाच्या ठिकाणांवर हल्ला करण्याचे आदेश दिले होते.
4 / 10
आता अमेरिकेचे अखेरचे सैनिकही सी 17 विमानाने मायदेशी परतलेत. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने मेजर जनरल क्रिस डोनाहू या अफगाणमधील अखेरच्या सैनिकाचा फोटो जारी करत आपल्या औपचारिक घरवापसीची घोषणा केलीय.
5 / 10
अमेरिकेने 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन एनड्यूरिंग फ्रीडम (Operation Enduring Freedom) सुरू केले होते. 2001 मध्ये अमेरिकेवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला होता. यानंतर अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी यामागे ओसामा बिन लादेन आणि त्याची संघटना अल-कायदाला जबाबदार धरलं. त्यावेळी ओसामा बिन लादेन आणि अल-कायदाला तालिबानने अफगाणिस्तानात आश्रय दिला होता. अमेरिकेच्या कारवाईनंतर 2001 ला तालिबान सत्तेबाहेर गेली आणि 2011 मध्ये लादेनला मारण्यात आलं.
6 / 10
अमेरीकेत कोरोनाचे दरदिवशी 1 लाख रुग्ण सापडतायत
7 / 10
जॉर्ज डब्लू. बुश (George W. Bush Afghan War) अमेरिकेचे अध्यक्ष असताना या युद्धाला सुरुवात झाली. तेव्हा त्यांच्यावर 2003 मध्ये इराकवर आक्रमणाऐवजी अफगाणिस्तानवर लक्ष्य केंद्रित केल्याचा आणि तिथंच सर्व संसाधन वापरल्याचा आरोप झाला.
8 / 10
ओबामांनी (Barack Obama) 2008 च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत सर्व ठिकाणी सुरू असलेले युद्ध संपवण्याचं आश्वासन दिलं. यात इराकमधील युद्धावर भर देण्यात आला. मात्र, 2009 मध्ये निवडून आल्यावर ओबामा यांनी अफगाणमध्ये 30,000 सैनिकांची वाढ केली. लादेनला 2011 मध्ये मारल्यानंतर दहशतवाद्यांशी सामना करण्यासाठी ओबामा यांनी सैन्य माघारी बोलावलं नाही असा दावा करण्यात आला. 2017 मध्ये ओबामा यांनी पद सोडलं तेव्हाही अफगाणमध्ये जवळपास 10,000 अमेरिकी सैनिक तैनात होते.
9 / 10
यानंतर डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आले. त्यांनीही सर्व सैनिक परत बोलावण्याची घोषणा केली. त्यांनी तालिबान्यांसोबत शांतता करारही केला. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. तालिबान आणि अमेरिकन सैन्यामधील संघर्ष सुरूच राहिला. यानंतर ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका झाली (US Afghanistan War History).
10 / 10
युद्धाच्या 20 वर्षात अमेरिकेने अफगाणमध्ये 2 ट्रिलियन डॉलरपेक्षा अधिक पैसे खर्च केले, 2400 पेक्षा अधिक अमेरिकेचे सैनिक मारले गेले, 1,00,000 पेक्षा अधिक अफगाण सैनिक आणि नागरिकांचाही मृत्यू झाला. त्यामुळे हे करुन अमेरिकेनं नेमकं काय मिळवलं असा प्रश्न उपस्थित केला जातोय (US Afghanistan War Cost).