काबूल: अफगाणिस्तानात ( Afghanistan Taliban ) आता महिलांनी ( Afghanistan Women ) तालिबान्यांविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. अफगाण महिलांनी एक ऑनलाईन कॅम्पेन ( Online Campaign against Afghan Taliban ) सुरु केलं आहे, ज्या त्या तालिबानने सांगितलेल्या सक्तीच्या ड्रेसकोडविरोधात आवाज उठवत आहेत. या महिला #DoNotTouchMyClothes आणि #AfghanistanCulture या हॅशटॅगखाली आपला राग व्यक्त करत आहेत. यावेळी या महिला रंगीबेरंगी कपड्यांतील फोटो पोस्ट करत आहेत, आणि अफगाणिस्तानची संस्कृती किती प्रगल्भ आहे हे तालिबान्यांना सांगत आहेत. ( Campaign against Afghan Taliban by Afghan women on social media, photo post by women in colorful costumes )
This is my traditional Afghani dress and that is my true culture. #AfghanistanCulture #afghanistanwomen pic.twitter.com/VlhiQBTYiB
— Wazhma Ayoubi (@WazhmaAyoubi) September 13, 2021
काय आहे अफगाणिस्तानातील कपड्यांची संस्कृती?
गूगलवर जाऊन फक्त अफगाणिस्तानची पारंपरिक वेशभूषा हा शब्द टाका. तुम्हाला भराभर फोटो दिसायला सुरुवात होईल. भडक रंग आणि त्यावर केलेलं नक्षीकाम तुमचं लक्ष वेधून घेईल. यातील प्रत्येक ड्रेस हा तुम्हाला विशेष वाटू शकतो. कारण हे सगळं काम हातांनी केलेलं आहे. भरलेले डिझाईन्स, गळाजवळ लावलेले आरसे आणि लांबच लांब घागरे तुम्हाला पाहायला मिळतील. अफगाणिस्तानचं राष्ट्रीय नृत्य असलेल्या अट्टनसाठी असेच कपडे घातले जायचे. यातील काही महिला टोपी घालायच्या तर काही स्कार्फ गुंडाळायच्या.
This is Afghan culture. I am wearing a traditional Afghan dress. #AfghanistanCulture pic.twitter.com/DrRzgyXPvm
— Dr. Bahar Jalali (@RoxanaBahar1) September 12, 2021
सोशल मीडियावर महिला काय कॅम्पेन करत आहेत?
15 ऑगस्टला जसा तालिबानने काबूलवर ताबा मिळवाला, तसं महिलांचे अधिकार पुन्हा काळकोठडीत बंद झाले. पुन्हा एकदा बुरखा आणि हिजाब घालण्याचा फर्मान तालिबान्यांनी काढलं. त्यातच काही महिलांनी तालिबानच्या समर्थनार्थ काबूलमध्ये काळे बुरखे घालून रैलीही काढल्या. त्यात बुरखा न घालणाऱ्या महिला या मुस्लीम नाहीत त्यांना देशाची काहीही देणंघेणं नाही अशा प्रतिक्रिया आल्या. त्यानंतर जगभरातील आधुनिक अफगाण महिला पुढं आल्या, आणि त्यांनी सोशल मीडियाद्वारे तालिबान्यांचं समर्थन करणाऱ्या महिलांना जोरदार प्रतुत्तर दिलं.
Attan is #Afghanistan’s national dance performed in group circles.
I painted this Attan as this is how I remember Afghan women while growing up.
This is us, not being lashed or stoned. We will remain poets. We will remain artists. We will preserver.
#WorldArtDay2021 pic.twitter.com/l7VQCRiVIF— Malali Bashir (@MalaliBashir) April 15, 2021
कुणी सुरु केलं अफगाण महिलांसाठीचं कॅम्पेन?
अमेरिकेच्या विद्यापिठात शिकवणाऱ्या डॉक्टर बहार जलाली यांनी हे कॅम्पेन सुरु केलं. आणि त्याला जगभरातील महिलांना पाठिंबा द्यायला सुरुवात केली. पारंपरिक अफगाण वेशभूषा परिधान केलेले फोटो या महिलांनी सोशल मीडियावर टाकले. आणि त्याखाली #DoNotTouchMyClothes आणि #AfghanistanCulture हे हॅशटॅग वापरले. जलालींच्या मते, तालिबान्यांनी अफगाणिस्तावरच नाही तर तिथल्या संस्कृतीवरही हल्ला केला आहे. अफगाणिस्तानची संस्कृती कधीही अशी नव्हती. आता तालिबान्यांच्या समर्थनार्थ ज्या महिलांच्या रॅली काढल्या जात आहे, ती अफगाणिस्तानची संस्कृती नाही. आम्ही दाखवत असलेली संस्कृती आम्ही अफगाण असल्याची ओळख असल्याचं जलाली म्हणाल्या. तालिबानने जो बुरखा घालण्याची सक्ती केली आहे, ती कधीही अफगाणिस्तानची ओळख नव्हती. जरी अफगाणिस्तान मुस्लीम देश असला तरी तिथं महिला विविधरंगी कपडे घालत होत्या. कधीही अफगाणिस्तानात बुरखा किंवा हिजाब घालण्याची सक्ती नव्हती. मात्र कट्टरतावाद्यांनी ही सक्ती केली आणि ज्यामुळे महिलांचं आयुष्य पुन्हा एकदा अंधारात गेलं आहे.
संबंधित बातम्या: