अमेरिकेने अफगाणच नाही तर तालिबान्यांसाठी मागे ‘ही’ धोकादायक शस्त्रास्त्रं आणि युद्ध विमानं मागे सोडलीय
अमेरिकेने 2001 मध्ये अफगाणमधील कट्टरतावाद्यांशी युद्ध करण्यास सुरुवात केली. त्यासाठी प्रचंड पैसा ओतला आणि शस्त्रास्त्रांचा खजाना अफगाणमध्ये निर्माण केला. मात्र, माघारी जाताना हाच शस्त्रास्त्र, विमान, गाड्या, युद्धसामुग्रीचा खजाना आता तालिबानच्या ताब्यात आलाय.
1 / 5
अमेरिकेने तालिबानसमोर गुडघे टेकत माघार घेतली आणि तालिबान्यांनी रान मोकळं असल्यासारखा अफगाणिस्तानचा ताबा घेतला. यावेळचं तालिबान 2001 च्या तालिबानपेक्षा खूप वेगळं दिसलं. या तालिबान्यांकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र होती आणि त्यांनी अफगाण सरकारच्या सैन्याला प्रचंड वेगानं झुकवलं. यासह तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर सत्ता हस्तगत केली. मात्र, हा प्रवास इथंच थांबत नाहीये.
2 / 5
अमेरिकेने 2001 मध्ये अफगाणमधील कट्टरतावाद्यांशी युद्ध करण्यास सुरुवात केली. त्यासाठी प्रचंड पैसा ओतला आणि शस्त्रास्त्रांचा खजाना अफगाणमध्ये निर्माण केला. मात्र, माघारी जाताना हाच शस्त्रास्त्र, विमान, गाड्या, युद्धसामुग्रीचा खजाना आता तालिबानच्या ताब्यात आलाय. बरं यावेळचे तालिबानी अनेक अंगांनी बदलले आहेत.
3 / 5
2001 प्रमाणे जुन्या गाड्या आणि आपल्या पारंपारिक बंदुकांसह दिसणारे हे तालिबानी यावेळी अत्यंत तयारीने अधिक ताकदवान आणि प्रशिक्षित दिसले. त्यांनी अमेरिकेच्या अद्ययावत बंदुका, गाड्या, हेलिकॉप्टर यांचाही वापर सुरू केलाय. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळेच जगाची चिंता वाढलीय. कारण या शस्त्रास्त्रांचा आता भविष्यात कसा वापर होणार हे कुणाच्याच हातात राहिलेलं नाही.
4 / 5
आधीच तालिबान अनेक दहशतवादी नेते आणि संघटनांना आश्रय देण्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे हा ही शस्त्रं या दहशतवाद्यांच्या हातात जाण्याचाही धोका आहे. अमेरिकेने दहशतवाद विरोधी लढाईत अफगाणिस्तानला अब्जावधी डॉलरचे शस्त्रास्त्र दिले होते. यात युद्ध विमानं, इंबरर ईएमबी 314 सुपर लाईट एअरक्राफ्ट, ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर, एमडी-530 एफ हेलिकॉप्टर, सेसना 208 विमान, बेल यूएच-1 हेलिकॉप्टरचा समावेश होता. आता हे सर्व तालिबान्यांच्या ताब्यात आहे. मात्र, काही जाणकार तालिबान्यांकडे हे चालवण्याचं कौशल्य नसल्याचा दावा करत आहेत.
5 / 5