काबुल : अफगाणिस्तानमध्ये गुरुवारी (26 ऑगस्ट) काबुल विमानतळावर झालेल्या दोन आत्मघातकी हल्लेखोरांनी नागरिकांवर केलेल्या हल्ल्यात जवळपास 72 लोकांचा मृत्यू झालाय. ही संख्या आणखी वाढण्याची भीती आहे. याशिवाय अनेक नागरिक गंभीर जखमी झालेत. एका अफगाण अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात जवळपास 143 लोक जखमी झालेत.
अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाच्या बाहेर ISIS कडून हल्ला करण्यात आला. यात 13 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला. इतर 18 सैनिक जखमी झालेत. दुसरीकडे ISIS-K या दहशतवादी समहुाने टेलीग्राम अकाउंटवर काबुल विमानतळावरील हल्ल्याची जबाबदारी घेतलीय.
अफगाणिस्तानवर काही दिवसांपूर्वीच तालिबानने ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या दुतावासातून या संदर्भातील अलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच फ्रान्स दुतावासातून देखील अलर्ट जारी करण्यात आला होता. तरीदेखील अखेर ज्याची भीती होती ती घटना आज घडली. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गेटवर काही तासांच्या अंतरावर दोन बॉम्बस्फोट झाले.
काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुख्य गेटवर ही घटना घडली. घटनेनंतर विमानतळ आणि आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली. लोकांची प्रचंड धावपळ सुरु आहे. विशेष म्हणजे घटनेच्या काही वेळापूर्वीच विमानतळावरुन उड्डाण घेतलेल्या इराणच्या एका लष्करी विमानावर गोळीबार करण्यात आला होता. पण सुदैवाने विमानातील कुणालाही नुकसान पोहोचलं नव्हतं. दुसरीकडे हल्ल्यानंतर आता स्थानिक नागरिकांकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.
अफगाणिस्तान देश 15 ऑगस्टपासून तालिबानने ताब्यात घेतला आहे. तेव्हापासून जगभरातील अनेक देशांकडून अफगाणिस्तानात अडकलेल्या त्यांच्या नागरिकांचं रेसक्यू मिशन सुरु आहे. आतापर्यंत अनेक देशांनी त्यांच्या नागरिकांना सुखरुप अफगाणिस्तानातून आपल्या मायदेशी घरी नेलं आहे. पण काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील तणाव हा दिवसेंदिवस वाढत आहे. तिथे गर्दिमुळे चेंगराचेंगरीच्या घटना समोर येत होत्या. त्यानंतर गोळीबाराच्या घटना समोर आल्या होत्या. आता थेट बॉम्बस्फोटची माहिती समोर आली आहे.
Watch : Visuals of second blast at Kabul Airport pic.twitter.com/DTSsBdXuIq
— The Bite (@_TheBite) August 26, 2021
Many people died including US soldiers in Kabul airport attack by ISIS-K in Afghanistan