अखेरचा किल्लाही ढासळला, पंजशीरवर अखेर तालिबान्यांचा कब्जा; संपूर्ण अफगाण तालिबानमय

| Updated on: Sep 06, 2021 | 11:54 AM

तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतल्यानंतरही त्यांना पंजशीरच्या धरतीवर पाऊल ठेवता आलं नव्हतं. पंजशीरमधील नागरिकांनी आणि अफगाणि सैनिकांनी पंजशीर आपल्या ताब्यात ठेवलं होतं. (Taliban capture Panjshir Valley says By the grace of God we won Panjshir Valley)

अखेरचा किल्लाही ढासळला, पंजशीरवर अखेर तालिबान्यांचा कब्जा; संपूर्ण अफगाण तालिबानमय
Panjshir Valley
Follow us on

काबुल: तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेतल्यानंतरही त्यांना पंजशीरच्या धरतीवर पाऊल ठेवता आलं नव्हतं. पंजशीरमधील नागरिकांनी आणि अफगाणि सैनिकांनी पंजशीर आपल्या ताब्यात ठेवलं होतं. परंतु, अखेर तालिबान्यांनी अफगाणी जनतेचा अखेरचा किल्लाही सर केला आहे. तालिबान्यांनी पंजशीरवर ताबा मिळवला आहे. मात्र, रेजिस्टेंस फोर्सने पंजशीर खोऱ्यावर तालिबान्यांनी ताबा मिळविल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे. (Taliban capture Panjshir Valley says By the grace of God we won Panjshir Valley)

अल्लाहची मदत. आमच्या देशाचं व्यापक समर्थन आणि देशाच्या सुरक्षेसाठी सुरू असलेल्या अंतिम प्रयत्नाच्या परिणामुळे पंजशीरवर विजय मिळवता आला आहे. आता पंजशीर खोरं इस्लामी अमिरातच्या नियंत्रणात आली आहे, असं तालिबानने म्हटलं आहे. पंजशीर खोऱ्यावर ताबा मिळविल्याचे काही फोटोही तालिबान्यांनी प्रसिद्ध केले आहेत. या फोटोत तालिबानी हातात शस्त्र घेऊन पंजशीर गव्हर्नरच्या कार्यालयाबाहेर उभे असलेले दिसत आहेत.

रेजिस्टेंस फोर्सने वृत्त फेटाळलं

मात्र, रेजिस्टेंस फोर्सने हे वृत्त फेटाळून लावलं आहे. प्रत्येक ठिकाणी आम्ही आहोत. जोपर्यंत न्याय आणि स्वातंत्र्य मिळत नाही, तोपर्यंत युद्ध सुरूच राहील, असं त्यांनी म्हटलं आहे. तालिबानला संघर्षविराम हवा आहे. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार या आठवड्याभरात पंजशीर घाटीत दोन्ही बाजूंचे प्रचंड नुकसान झालं आहे. तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहित यांनी तालिबानने पंजशीरवर संपूर्णपणे ताबा मिळविल्याचं म्हटलं आहे. रेजिस्टेंस फोर्सचं नियंत्रण असलेला तो शेवटचा प्रांत होता. दरम्यान, रेजिस्टेंस फोर्सचे नेते अहमद मसूदकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

एनआरएफची सैन्य कारवाई रोखण्याची सूचना

नॅशनल रेजिस्टेंस फ्रंटने रविवारी रात्री उशिरा तालिबानला पंजशीरमध्ये सैन्य कारवाई थांबवण्याची विनंती केली आहे. तसेच सैन्य मागे घेण्याचा प्रस्तावही दिला आहे. त्याबदल्यात एनआरएफ त्यांच्या फोर्सला कारवाई न करण्याच्या सूचना देणार आहे. पंजशीर खोऱ्यावर ताबा मिळवल्याचं तालिबानने रविवारी रात्रीच म्हटलं होतं. मात्रं प्रो एनआरएफ सोशल मीडिया अकाऊंट्सने हा दावा फेटाळून लावला होता. तर, रविवारी रात्री उशिरा नॅशनल रेजिस्टेंस फ्रंटचे फहीम दश्ती आणि जनरल अब्दूल वुदोद यांचा या युद्धात मृत्यू झाला आहे.

पंजशीर खोरे फार पूर्वीपासून तालिबानविरोधी शक्तींचे केंद्र

हिंदुकुश पर्वतरांगांनी वेढलेले पंजशीर खोरे फार पूर्वीपासून तालिबानविरोधी शक्तींचे केंद्र आहे. अफगाण नेता अहमद शाह मसूदने सोव्हिएत-अफगाण युद्ध आणि तालिबानशी युद्धादरम्यान 2001 मध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत पंजशीर खोऱ्याचे संरक्षण केले. यामुळेच येथील लोकांनी पुन्हा एकदा शस्त्र हाती घेतलीत. (Taliban capture Panjshir Valley says By the grace of God we won Panjshir Valley)

 

संबंधित बातम्या:

तर डोक्यात दोन गोळ्या घाल, अफगाणिस्तानच्या माजी उपराष्ट्रपतीचे गार्डला आदेश, नेमकं काय घडलं त्या”दिवशी काबूलमध्ये?

Indian in Afghanistan : अफगाणमधील भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न, 168 जणांना घेऊन विमान भारतात

काबूल विमानतळावरुन 150 पेक्षा जास्त प्रवाशांचं तालिबानकडून अपहरण, अनेक भारतीयांचा समावेश

(Taliban capture Panjshir Valley says By the grace of God we won Panjshir Valley)