अफगाणिस्तान : कंदहारच्या शिया मशिदीत 3 साखळी स्फोट, हल्ल्यात 32 जण ठार झाल्याची माहिती

| Updated on: Oct 15, 2021 | 6:24 PM

याआधी शुक्रवारी उत्तर अफगाणिस्तानातील शिया मशिदीत झालेल्या स्फोटात 100 हून अधिक जण ठार झाले होते. शेकडो लोक नमाज पठण करत असताना हा स्फोट झाला. इस्लामिक स्टेट खोरासन (IS-K) ने बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती.

अफगाणिस्तान : कंदहारच्या शिया मशिदीत 3 साखळी स्फोट, हल्ल्यात 32 जण ठार झाल्याची माहिती
अफगाणिस्तान : कंधारच्या शिया मशिदीत 3 साखळी स्फोट
Follow us on

काबुल : अफगाणिस्तानच्या कंदहारच्या इमाम बर्गह मशिदीत(Kandahar’s Imam Bargah Mosque) बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त आहे. अफगाणिस्तानच्या मीडिया टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, या स्फोटात आतापर्यंत 32 जण ठार झाल्याची माहिती आहे. त्याचबरोबर 45 लोक जखमी झाले आहेत. ही शिया मशीद आहे, ज्यात लोक शुक्रवारच्या नमाजासाठी जमले होते. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की मशिदीमध्ये एकामागून एक तीन स्फोट झाले. गृह मंत्रालयाचे प्रवक्ते सईद कोस्ती म्हणाले की, या स्फोटात डझनभर लोक ठार आणि जखमी झाल्याची माहिती आहे. तालिबानचे विशेष दल घटनास्थळी पोहोचले असून कोणत्या प्रकारचा स्फोट होता याची चौकशी करत आहोत. (Three blasts at Shia mosque in Kandahar Afaganistan, 32 people killed)

याआधी शुक्रवारी उत्तर अफगाणिस्तानातील शिया मशिदीत झालेल्या स्फोटात 100 हून अधिक जण ठार झाले होते. शेकडो लोक नमाज पठण करत असताना हा स्फोट झाला. इस्लामिक स्टेट खोरासन (IS-K) ने बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती. आयएसने आत्मघाती हल्लेखोराची ओळख उइगर मुस्लिम असल्याचे सांगितले. या हल्ल्यात शिया आणि तालिबान या दोघांना लक्ष्य करण्यात आले आहे, जे चीनकडून उइगरांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अडथळा आणत आहेत.

शियाला का केले लक्ष्य?

इस्लामिक स्टेट गटातील अतिरेक्यांचा अफगाणिस्तानातील शिया मुस्लिम अल्पसंख्याकांवर हल्ला करण्याचा मोठा इतिहास आहे. ज्या लोकांना लक्ष्य केले गेले ते हजारा समुदायाचे होते, जे सुन्नी बहुल देशात बऱ्याच काळापासून भेदभावाचे शिकार बनले आहेत. हा हल्ला ऑगस्टच्या अखेरीस अफगाणिस्तानातून अमेरिकन आणि नाटो सैन्याने माघार घेतल्यानंतर आणि तालिबान्यांनी देशावर कब्जा केल्यानंतर केला आहे.

काबूलची मशीदही केली होती लक्ष्य

सुमारे दोन आठवड्यांपूर्वी कुंदुज आणि कंधारच्या मशिदींवर हल्ला करण्यापूर्वी काबूलमधील मशिदीलाही लक्ष्य करण्यात आले होते. येथे मशिदीच्या गेटवर बॉम्बस्फोट झाला होता. ज्यात किमान पाच लोकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामागे तालिबानचा कट्टर शत्रू असलेल्या इस्लामिक स्टेटलाच दोषी मानले जात आहे. काबूलमधील या मशिदीवर हल्ला झाला तेव्हा तालिबानचे प्रवक्ते झबीहुल्ला मुजाहिद यांच्या आईच्या शोकसभेसाठी मोठ्या संख्येने लोक येथे जमले होते. (Three blasts at Shia mosque in Kandahar Afaganistan, 32 people killed)

बांग्लादेशात दुर्गा पूजा उत्सवावर समाजकंटकांचे हल्ले

बांग्लादेशात बुधवारी कोमिल्ला जिल्हातील दुर्गा पूजा उत्सवादरम्यान मंडपाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली होती. दुर्गा पूजा मंडप तोडफोड़ आणि हिंदू मंदिरांवर होणाऱ्या हल्ल्यांचा पंतप्रधान शेख हसीना यांनी निषेध केला आहे. शेख हसीना यांनी या प्रकरणात सहभागी असणाऱ्यांना इशारा दिला आहे. समाजविरोधी कृती करणारी व्यक्ती कोणत्याही धर्माची असली तरी तिला सोडलं जाणार नाही, असं शेख हसीना म्हणाल्या. बांग्लादेशच्या पंतप्रधानांनी याशिवाय भारताला देखील सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

बीबीसी बांग्लाच्या रिपोर्टनुसार शेख हसीना यांनी भारतात अशा प्रकारची कोणतीही घटना घडू नये ज्यानं बांग्लादेशातील हिंदू समुदायावर परिणाम होईल, अशी आशा हसीना यांनी व्यक्त केली आहे. बांगलादेशच्या चांदीपूरच्या हाजीगंज उपजिल्ह्यात बुधवारी दुर्गा पूजेच्या उत्सवादरम्यान झालेल्या जातीय हिंसाचारात तीन लोकांचा मृत्यू झाला असून 60 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एका फेसबुक पोस्टमध्ये कुराणचा कथित अपमान केल्यामुळे हिंसाचार उसळला होता. यानंतर अनेक दुर्गापूजा पंडालची तोडफोड करण्यात आली होती.

इतर बातम्या

धक्कादायक ! चवदार सांभार बनवले नाही म्हणून तरुणाकडून आई आणि बहिणीची हत्या

फारकत घेतलेल्या बायकोच्या हत्येचा कट, कर्ज काढून 13 लाखांची सुपारी, पोलीसांचीही अफलातून खेळी, आरोपी जेरबंद