काबुल : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) अडकलेल्या भारताची लेक हिना प्रकरणी टीवी9 च्या अभियानाचा परिणाम दिसू लागलाय. हिना मायदेशी परतण्याची आशा पल्लवित झालीय. अफगाणिस्तानमधून विमानसेवा सुरू झाल्यानंतर लगेचच हिनाला भारतात आणलं जाणार आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिलीय. दुसरीकडे दबाव वाढल्यानंतर अफगाणिस्तानमधील हिनाच्या सासरच्या लोकांनीही तिला माहेरी पाठवण्याची तयारी दाखवली आहे. हिनाने आपली आई आणि भावाला फोन करुन ही माहिती दिली. विशेष म्हणजे सासरचे लोक हिनाला तिच्या मुलासह भारतात पाठवण्यास तयार झालेत.
तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तेथे अनेक धार्मिक नियमांची अंमलबजावणी सुरू झालीय. यात महिलांवर अनेक निर्बंध लादले जात आहेत. या स्थितीत अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या हिनाने कानपूरच्या बाबूपुरवा भागात राहणाऱ्या आपल्या आईला फोन करुन तेथील अडचणी सांगितल्या. तसेच भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, आईला काय करावं काहीच सुचलं नाही. अखेर या भागातील एका वकिलाने हिनाच्या आईला मदत केली. बुधवारी (1 सप्टेंबरला) हिनाच्या आईने टीव्ही 9 च्या स्पेशल शोमध्ये आपल्या मुलीला भारतात परत आणण्याची विनंती केली.
टीवी 9 ने हिनाची आपबिती तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीनलाही सांगितली. यानंतर सुहैल शाहीनने हिनाला अफगाणिस्तानमध्ये काहीही होणार नाही असा विश्वास दिला. तसेच तिला अफगाणिस्तानमध्ये राहायचं असेल तर ती राहू शकते आणि जर भारतात यायचं असेल तर ती कमर्शियल फ्लाइट सुरू झाल्यानंतर येऊ शकते, असं सांगण्यात आलं.
टीव्ही9 ने हिनाची बातमी लावून धरल्यानंतर भारतीय परराष्ट्र खात्याने देखील याची दखल घेत अफगाणिस्तानमधून फ्लाईट सुरू होताच हिनाला भारतात आणणार असल्याची माहिती दिलीय. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, “अफगाणिस्तानमधून फ्लाइट सुरू होताच हिनाला परत भारतात आणलं जाईल.”
मुंबई एका बारमध्ये काम करत असताना हिनाचं मोहम्म्द गनी नावाच्या युवकावर प्रेम झालं. तो मूळचा अफगाणिस्तानचा होता. यानंतर दोघांनी प्रेमविवाह केला. दरम्यान, दोघांना एक मुलही झालं. यानंतर मोहम्मद गनी हिनाला घेऊन अफगाणिस्तानला गेला. अनेक दिवस तो हिनासोबत अफगाणिस्तानलाच राहिला. या काळात हिनाला आणखी 2 मुलं झाली. नंतर मोहम्मद गनी अफगाणिस्तानहून मुंबईला परत आला. मात्र, अफगाणमध्ये राहिलेल्या हिनाला सासरचे लोक छळायला लागले असा आरोप हिनाने केलाय.
TV9 impact In laws of Indian daughter Hina agree to send her India will return very soon