नवी दिल्ली : अबूधाबी येथे स्वामी नारायण मंदिराच उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कतारला पोहोचले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी कतार सरकारने डीनरच आयोजन केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दुसरा कतार दौरा आहे. याआधी जून 2016 मध्ये ते कतारला गेले होते. कतार आणि भारतामध्ये संबंध आधीपासूनच चांगले होते. पण आता हे संबंध अधिक दृढ होत चालले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने भारत-कतार संबंध कसे बळकट होत चाललेत, ते समजून घेऊया.
कतार येथे दीड वर्षाच्या सुनावणीनंतर आठ माजी भारती नौसैनिकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. भारताने या विषयात कायदेशीर आणि रणनितीक पर्यायांचा वापर केला. याचा परिणाम असा झाला की, कतारने या सगळ्यांची शिक्षा कमी केली. नंतर काही दिवसांनी सुटका केली. आता सात भारतीय नौसैनिक भारतात आपल्या घरी परतले आहेत. भारत याला आपला कुटनितीक विजय मानतोय. भारताची अर्थव्यवस्था सुधारतेय त्याचा सुद्धा दुसऱ्या देशांवर पडणारा हा प्रभाव आहे.
त्यावेळी भारत उभा राहिला
कतारसोबत भारताचे संबंध किती मजबूत आहेत, जगाला याची जाणीव 2017 मध्येच झाली होती. त्यावेळी चार खाडी देशांनी कतारवर बंदी घातली होती. त्यावेळी भारताने तिथे खाण्या-पिण्याच सामान आणि औषध पाठवून मैत्री निभावली. सौदी अरेबिया, यूएई, बहरीन आणि इजिप्त या चार देशांनी कतारसोबत द्विपक्षीय संबंध तोडले होते. कतारच्या विमानांना सुद्धा हवाई क्षेत्राचा वापर करण्यावर बंदी घातली होती. भारताचा खास मित्र सौदी अरेबियाच या बहिष्कारच नेतृत्व करत होता. भारताने या विषयात हस्तक्षेप केला नाही. पण कतारची मदत करण्यापासून मागे सुद्धा हटला नाही. आज कतार आणि सौदी अरेबिया दोघांसोबत भारताचे चांगले संबंध आहेत.
20 वर्षांसाठी एक महत्त्वाचा करार
भारत आणि कतारमध्ये पुढच्या 20 वर्षांसाठी एक महत्त्वाचा करार झालाय. 78 अब्ज डॉलरच्या या करारातंर्गत कतार भारताला वर्ष 2048 पर्यंत लिक्विफाइड नॅच्युरल गॅसचा (एलएनजी) पुरवठा करणार आहे. कतारकडून दरवर्षी भारताला 7.5 मिलियन टन गॅस मिळणार आहे.
त्या देशात किती हजार भारतीय कंपन्या
भारतात त्रिपुरा राज्य आहे, त्यापेक्षा कतारच क्षेत्रफळ थोड जास्त आहे. 25 लाख लोकसंख्या असलेल्या कतारमध्ये साडेसात लाख भारतीय आहेत. तिथल्या अर्थव्यवस्थेत भारतीयांच महत्त्वाच योगदान आहे. कतर चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीनुसार 6000 पेक्षा जास्त छोट्या-मोठ्या भारतीय कंपन्या तिथे व्यवसाय करतायत.