Syria Civil War : सीरिया मोठ्या संकटात, एका देशाचा एअर स्ट्राइक, दुसऱ्या देशाचं स्पेशल ऑपरेशन

| Updated on: Dec 09, 2024 | 10:24 AM

Syria Civil War : असद सरकारच्या पतनानंतर सीरियामध्ये दोन देश आक्रमक झाले आहेत. बशर-अल-असद त्यांच्या कुटुंबासह बाहेर पळाले. पण सीरियावर चौफेर कारवाई सुरु आहे. दोन देशांनी सीरियामध्ये एअर स्ट्राइक केला आहे.

Syria Civil War : सीरिया मोठ्या संकटात, एका देशाचा एअर स्ट्राइक, दुसऱ्या देशाचं स्पेशल ऑपरेशन
Air Strike
Follow us on

सीरियामध्ये सत्ता आता बंडखोरांच्या हाती आली आहे. अनेक वर्षांपासून सत्ता उपभोगणाऱ्या बशर-अल-असद यांच्या कुटुंबाने पलायन केलं आहे. सीरियाची असद यांच्या तावडीतून सुटका झाली असली, तरी संकट अजून कमी झालेलं नाही. अमेरिकेने सीरियामधील ISIS च्या तळावर डझनभर एअर स्ट्राइक केले आहेत. महत्त्वाच म्हणजे अमेरिकेने या हवाई हल्ल्यासाठी एअरफोर्सच बी-52 स्ट्रेटोफोर्ट्रेस बॉम्बर, एफ-15ई स्ट्राइक ईगल्स आणि ए-10 थंडरबोल्ट II फायटर जेटचा वापर केला. सेंट्रल सीरियामधील इस्लामिक स्टेटचे नेते आणि शिबिरांवर अनेक हवाई हल्ले केले.

अमेरिकेने इसिसच्या 75 पेक्षा जास्त ठिकाणांवर हवाई हल्ले केले. अमेरिकी सेंट्रल कमांडच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. असद सरकारच्या पतनानंतर सीरियात निर्माण झालेली अशांतता विचारात घेऊन हे हल्ले केले. ISIS ला या स्थितीचा फायदा उचलता येऊ नये, यासाठी हे हल्ले केले. दुसऱ्याबाजूला इस्रायल सुद्धा सीरियामध्ये हवाई हल्ले करत आहे.

स्ट्राइकमुळे किती नुकसान झालं?

“राष्ट्रपतींच्या आदेशावरुन आम्ही इसिसचे फायटर्स आणि नेत्यांच्या ठिकाणांना लक्ष्य केलं” असं अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितलं. अत्यंत अचूकतेने हे हल्ले करण्यात आले. कुठल्याही नागरिकाला यामध्ये इजा झालेली नाही असं पेंटागनकडून सांगण्यात आलं. एअर स्ट्राइकमुळे किती नुकसान झालं? त्याचा आढावा घेत आहोत, असं अमेरिकी सेंट्रल कमांडकडून सांगण्यात आलं.

बफर झोनमध्ये सैन्य तैनात

असद सरकारच्या पतनानंतर इस्रायली सैन्याने गोलान हाइट्समधीस आपली स्थिती मजबूत करण्यासाठी बफर झोनमध्ये सैन्य तैनात केलं आहे. त्यांनी सीरियामधील हा भाग ताब्यात घेतला आहे असं इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितलं. मागच्या काही तासात इस्रायली एअर फोर्सने सीरियामधील 100 पेक्षा जास्त ठिकाणी हल्ला केला आहे. इस्रायलने या हल्ल्याबद्दल स्पष्टीकरण देताना सांगितलं की, “आम्ही त्या ठिकाणी हल्ले करत आहोत, जी कट्टरपंथीयांच्या हाती लागल्यास इस्रायलच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो”