America Air Strike | अमेरिकेने आपल्या तीन सैनिकांच्या मृत्यूचा बदला घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी प्रत्युत्तराची कारवाई करणार असं सांगितलं होतं. त्यानुसार, अमेरिकेने Action घेतली आहे. अमेरिकेने इराक आणि सीरियामधील तळावर हल्ले केले आहेत. अमेरिकेने शुक्रवारी इराणच्या रिवोल्यूशनरी गार्ड (IRGC) आणि त्यांच समर्थन असलेल्या मिलिशिया ग्रुपशी संबंधित 85 पेक्षा अधिक ठिकाणांवर हल्ले केले आहेत. अमेरिक सैन्याने खास करुन इराणच्या कुद्स फोर्सला टार्गेट केलं. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या आदेशानंतर अमेरिकन सैन्याने इराणी ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला.
जॉर्डनमध्ये अमेरिकन सैन्य तळावर ड्रोन हल्ला झाला होता. यामध्ये तीन अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अमेरिकेने इराक आणि सीरियमधील इराणची कुद्स फोर्स आणि त्यांचे तळ नष्ट करण्याच ठरवलं. सैन्य ऑपरेशन सुरु करणार असल्याच अमेरिकेने आधीच सांगितलं होतं. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी परवानगी सुद्धा दिली होती.ट
एवढ्या मोठ्या हल्ल्यानंतर जो बायडेन काय म्हणाले?
शुक्रवारी अमेरिकन सैन्याने जॉर्डन तळावरील हल्ल्याचा बदला घेतला. या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत, असं सीरियाच्या मीडियाने म्हटलं आहे. त्यांनी नेमका आकडा सांगितलेला नाही. अमेरिकेने 85 ठिकाणांवर स्ट्राइक केलाय. तुम्ही कुठल्याही अमेरिकन नागरिकाच नुकसान केलं, तर आम्ही उत्तर देणार असं इराक आणि सीरियामधील स्ट्राइकनंतक जो बायडेन यांनी म्हटलं आहे.
‘….तर आम्ही उत्तर देणार’
आमच्याकडून कारवाई सुरु झालीय. ती यापुढेही सुरु राहिलं, असं अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी म्हटलय. “अमेरिकेला मध्य पूर्वच नाही, जगात कुठेही संघर्ष नकोय, पण तुम्ही आमच नुकसान केलं, तर आम्ही उत्तर देणार” असं बायडेन यांनी म्हटलं आहे.
❗🇺🇸⚔️🇮🇶🇸🇾🇮🇷 – More visuals of the earlier US strikes.
US President Joe Biden says the response to the killing of US troops began tonight and will continue at “times and places of our choosing.” pic.twitter.com/mEUJfrU3ZD
— 🔥🗞The Informant (@theinformantofc) February 2, 2024
अमेरिकेने ठरवलय की….
मागच्या रविवारी सीरियाच्या सीमेजवळ जॉर्डनमध्ये अमेरिकन सैन्य तळावर ड्रोन हल्ला झाला. यात तीन सैनिक मारले गेले, 40 जण जखमी झाले. अलीकडच्या काही वर्षातील अमेरिकन सैन्यावरील हा मोठा हल्ला आहे. अमेरिकेने या हल्ल्यासाठी इराणच समर्थन असलेल्या मिलिशिया ग्रुपला जबाबदार धरलं होतं. अमेरिकेने सीरिया आणि इराकमधील इराणी तळ समूळ नष्ट करायच ठरवलं आहे.