अयोध्येनंतर या मुस्लीम देशात पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार मंदिराचं उद्घाटन

| Updated on: Jan 11, 2024 | 6:14 PM

अयोध्येत भव्य राम मंदिराची जोरदार तयारी सुरू आहे. 20 हजार चौरस मीटर परिसरात हे मंदिर बांधण्यात आले आहे. BAPS या संस्थेद्वारे त्याचे बांधकाम केले जात आहे. या मंदिराचे उद्घाटन 14 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

अयोध्येनंतर या मुस्लीम देशात पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार मंदिराचं उद्घाटन
Follow us on

Hindu mandir in Mulim country : अयोध्यत राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आहे. २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अयोध्येत जोरदार तयारी सुरु आहे. संपूर्ण अयोध्या नगरीला छावणीचं स्वरुप आले आहे. अयोध्या नगरी श्री रामांच्या स्वागतासाठी सजली आहे. देशात सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. देशात अनेक ठिकाणी हा उत्सव साजरा केला जाणार आहे. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या भव्य मंदिराच्या लोकार्पण सोहळा पाहण्यासाठी देश-विदेशातील लोकं आतुर झाले आहेत. 22 जानेवारीला जगाच्या नजरा अयोध्येकडे असतील. पण तुम्हाला माहित आहे का की, आणखी एका मुस्लीम देशात मंदिर बांधले जात आहे. ज्याचं उद्घाटन 14 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते होणार आहे.

अबुधाबीमध्ये पहिले हिंदू मंदिर

भारताचा मित्र राष्ट्र संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE मध्ये भव्य राम मंदिराची तयारी जोरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 फेब्रुवारी रोजी अबुधाबी येथे पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, UAE ची राजधानी अबुधाबीमध्ये पहिले हिंदू मंदिर तयार झाले आहे. अबुधाबीमध्ये पहिले हिंदू मंदिर बांधणाऱ्या BAPS स्वामीनारायण या संस्थेने उद्घाटन समारंभासाठी पंतप्रधान मोदींना आमंत्रित केले आहे. त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे.

हे सुद्धा वाचा

अबूधाबीमध्ये बांधले जात असलेले हे मंदिर 14 फेब्रुवारी रोजी दर्शनसाठी खुले होणार आहे. जेव्हा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होईल. हे मंदिर 20,000 चौरस मीटर जागेवर बांधले गेले आहे. मंदिराची रचना आधुनिक शैलीत आहे. प्राचीन आणि पाश्चात्य स्थापत्यकलेचा मिलाफ करून हे मंदिर बांधण्यात येत आहे. यावर कोरीव काम देखील केलेले आहे.

2018 मध्ये या मंदिराची पायाभरणी

भव्य मंदिराची जोरदार तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये या मंदिराची पायाभरणी केली होती. त्यामुळे अयोध्येत तर तयारी सुरु आहेच. पण अबुधाबीमध्ये देखील हे मंदिर दर्शनासाठी खुले होणार असल्याने उत्साहाचं वातावरण आहे.

अयोध्येत होत असलेल्या कार्यक्रमात 55 देशांमध्ये राहणाऱ्या अनिवासी भारतीयांना जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भारतच नाही तर अमेरिका आणि इतर देशांमध्ये राहणाऱ्या भारतीय लोकांमध्ये ही उत्साहाचे वातावरण आहे.