द्वेषाच्या पायावर उभ्या राहिलेल्या पाकिस्तानला विकास आणि प्रगती या दोन शब्दांचा अर्थ कधीच समजला नाही. दुसऱ्याच्या वाईटात स्वत:चा आनंद शोधण्याच्या वृत्तीमुळे माणसाचा कधी घात होतो, हे त्यालाच कळत नाही. आज पाकिस्तानच्या बाबतीत सुद्धा हेच होतय. भारताच्या वाईटावर टपलेला हा देश आज फुटीच्या उंबरठ्यावर आहे. त्या देशात गृहयुद्ध सुरु आहे. 11 मार्च रोजी क्वेटावरुन पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेसच बलूच बंडखोरांनी केलेलं अपहरण हे त्याचच उदहारण आहे. पाकिस्तानात सध्या अंतर्गत यादवी, असंतोषाची स्थिती आहे. एकाबाजूला अफगाणिस्तान सीमेवर तालिबानसोबत संघर्ष सुरु आहे. दुसरीकडे खैबर पख्तूनख्वा, बलूचिस्तान या प्रांतांचा स्वातंत्र्यासाठी लढा सुरु आहे. त्यातून पाकिस्तानी सैन्यावर हल्ले होत आहेत. बॉम्बस्फोट, घात लावून सैन्य वाहनावर हल्ला यामध्ये पाकिस्तानी सैनिक, नागरिकांचा नाहक बळी जात आहे. भारताला त्रास देण्यासाठी म्हणून पाकिस्तानने दहशतवादाच जाळं उभारलं. हा जो त्यांनी दहशतवादाचा भस्मासूर उभा केला, तो त्यांच्यावरच उलटला हा भाग वेगळा. पण पाकिस्तानला आपल्याच देशातील लोकांचा विश्वास संपादन करता आला नाही, मन जिंकता आलं नाही. त्यामुळेच...