बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या हिंसक आंदोलनामुळे शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर जीवाचा धोका असल्याने त्यांना देश सोडावा लागला. शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. पण येथून त्यांना लंडन किंवा अमेरिकेला जाण्याचा विचार होता. पण शेख हसीना यांना ब्रिटनकडून धक्का बसल्यानंतर आता अमेरिकेने ही झटका दिला आहे. शेख हसीना भारतातून लंडनला जाणार असल्याची चर्चा होती. ब्रिटन सरकार कठोर भूमिका दाखवत आहे. शेख हसीना यांना ब्रिटनमधून हिरवा सिग्नल मिळताना दिसत नाही. बांगलादेशातील विरोधकांच्या जवळच्या सूत्रांनी दावा केला आहे की, अमेरिकेने पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांचा व्हिसाही रद्द केला आहे.
ब्रिटिश इमिग्रेशन नियम कोणालाही आश्रय घेण्यासाठी प्रवास करण्यास परवानगी देत नाहीत. ब्रिटनच्या या भूमिकेमुळे शेख हसीना यांना मोठा धक्का बसला आहे. सध्या त्या भारतात आहेत. गाझियाबादच्या हिंडन एअरपोर्टच्या गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामी आहेत. त्यामुळे काही काळ आता त्यांना इथेच राहावे लागणार आहे.
ज्या लोकांना आंतरराष्ट्रीय संरक्षणाची आवश्यकता आहे त्यांनी प्रथम सुरक्षित देशात आश्रया घेतला पाहिजे असं यूकेने म्हटलं आहे. ब्रिटिश सरकार हसीना यांच्या औपचारिक आश्रयाच्या विनंतीवर कारवाई करत आहे. शेख हसीना यांची बहिण रेहाना यांच्याकडे यूकेचे नागरिकत्व आहे. त्यामुळे त्या लवकरच यूकेला जाऊ शकतात.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या कार्यकाळात बांगलादेश आणि अमेरिकेतील संबंध चांगले नव्हते. त्यामुळे त्यांना आता अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेख हसीना यांनी अमेरिकेला लष्करी तळ बांधण्यासाठी स्पष्ट नकार दिला होता. अमेरिकेनेही शेख हसीनासाठी आपले दरवाजे बंद केले आहेत. अमेरिकेने शेख हसीना यांचा यूएस व्हिसा रद्द केला आहे, म्हणजेच त्या आता अमेरिकेला जाऊ शकणार नाहीत.
बांगलादेशमधील परिस्थिती अजूनही बिकट आहे. शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर ही जाळपोळ सुरु आहे. दुकाने लुटली जात आहेत. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केले जात आहे. बांगलादेशमध्ये लवकरच काळजीवाहू सरकार स्थापन केलं जाणार आहे. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते.