Israel-Hamas conflict | आज इस्रायलसमोर एकाचवेळी चौघांना भिडण्याच मोठं चॅलेंज, कोण आहेत हे चौघे?

| Updated on: Oct 09, 2023 | 1:57 PM

Israel-Hamas conflict | खऱ्या युद्धाला सुरुवात झाल्यानंतर एकाचवेळी इस्रायलविरोधात चार फ्रंट उघडले जातील. या सगळ्याचा सामना करणं इस्रायलसाठी नक्कीच सोपं नसेल. पण इस्रायलसाठी हे अशक्य सुद्धा नसेल. हे चार फ्रंट कुठले?

Israel-Hamas conflict | आज इस्रायलसमोर एकाचवेळी चौघांना भिडण्याच मोठं चॅलेंज, कोण आहेत हे चौघे?
Israel-Hamas conflict
Follow us on

जेरुसलेम : आज इस्रायल संकटात आहे. हमासने शनिवारी अचानक हल्ला केला. यात शेकडो निरपराध नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. गाझा पट्टीतून हमासच्या दहशतवद्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये घुसखोरी केली. हमासच्या या दहशतवाद्यांनी आणि समर्थकांनी इस्रायलमध्ये अक्षरक्ष: हैदोस घातला. मुलं, लहान बाळं, आजीबाई, महिला कोणाला सोडलं नाही. हमासने अमानवीय कृत्यांचा कहर केला. हे सर्व इतक अचानक घडलं की, इस्रायलला हे सर्व रोखणं शक्य झालं नाही. हमास इतक्या मोठ्या प्रमाणात या ताकदीचा हल्ला करेल, याची इस्रायलने अजिबात कल्पना केली नव्हती. पहिले चार ते पाच तास इस्रायली यंत्रणा अपेक्षित उत्तर देऊ शकल्या नाहीत. सर्व यंत्रणा कोलमडल्याची स्थिती निर्माण झाली होती. इस्रायल खरंतर अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी सक्षम देश आहे. कारण त्यांच्याकडे त्या तोडीच्या यंत्रणा आहेत. पण शनिवारी सगळच कोसळलं. मोसाद सारख्या जगप्रसिद्ध गुप्तचर संस्थेच अपयश अधिक प्रकर्षाने दिसून आलं.

अर्थात हे सगळ एका दिवसात किंवा काही तासात घडलेलं नाही. यामागे खूप मोठी प्लानिंग होती. हमासला स्वबळावर असं काही करणं शक्य नव्हतं. त्यांच्यामागे कोणाचतरी बळ असल्याशिवाय हमास इतक्या मोठ्या प्रमाणात हल्ला करु शकत नाही, हे वास्तव आहे. इस्रायलवर हा हल्ला खूप विचारपूर्वक करण्यात आला आहे. इस्रायल कशा पद्धतीने React होणार, याचा अनुभव हमासकडे आहे. त्यामुळे सामना करण्याची तयारी सुद्धा हमासने करुन ठेवली असणार. सध्यातरी हमासचा चेहरा समोर आहे. पण यामागे जे चेहरे आहेत, ते आता हळूहळू समोर येऊ लागले आहेत. इस्रायलने आता गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरु केले आहेत. पण त्यांनी अजून खऱ्याने अर्थाने युद्ध पुकारलेलं नाही. करण इस्रायली सैन्य पूर्णपणे गाझापट्टीत घुसलेलं नाही. त्यांनी असं काही करावं, हा हमासच्या रणनितीचा भाग असणारच.

इस्रायल विरुद्ध एकाच वेळी चार फ्रंट उघडले जातील

इस्रायलला पटकन Reaction देता येऊ नये, हे सर्व अशा पद्धतीने केलय. कारण खऱ्या युद्धाला सुरुवात झाल्यानंतर एकाचवेळी चारफ्रंट उघडले जाऊ शकतात. इस्रायलला एकाआघाडीवर हमास, दुसऱ्या बाजूला लेबनॉन सीमेवर हेझबोल्लाह, सीरियीमधील हमास समर्थक दहशतवादी गट आणि इराणशी सुद्धा लढाव लागू शकतं. या सगळ्यांना हमास आणि पॅलेस्टाइनबद्दल सहानुभूमी आहे. इस्रायलने इराणच्या काही लष्करी अधिकारी, वैज्ञानिकांना संपवलं होतं. इराणने आता त्याचा बदला घेतला, असं बोलल जातय. भले इस्रायलला एकाचवेळी चार फ्रंटवर लढाव लागेल. पण त्यांच्यासाठी हे अशक्य नाहीय. कारण इस्रायलकडे 1967 आणि 1973 साली एकाचवेळी अनेक अरब राष्ट्रांशी लढण्याचा अनुभव आहे. इस्रायलने एकाचवेळी 5 ते 6 देशांबरोबर लढाई लढून जिंकली सुद्धा आहे. त्यामुळे आता इस्रायलसाठी काहीही अशक्य नाहीय.