अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून काल डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली. शपथविधी झाल्यानंतर ट्रम्प मध्य पूर्वेच्या शांततेसाठी काही महत्त्वाची पावलं उचलतील अशी अपेक्षा होती. इस्रायलला सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या. वेस्ट बँकमध्ये ते इस्रायलच्या एनेक्स प्लानला पाठिंबा देतील. पण ट्रम्प यांनी गाझा युद्धाबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन सर्वांनाच चकीत केलय. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात आश्वासन दिलं होतं की, सत्तेवर विराजमान होताच 24 तासात ते गाझा-इस्रायल युद्ध थांबवतील. ट्रम्प यांच्या शपथविधी आधी इस्रायल-हमास युद्धविराम झाला. पण हा युद्धविराम किती काळासाठी राहील, याची गॅरेंटी नाहीय. जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांना हा युद्धविराम दिर्घकाळ चालणार की, नाही? या बद्दल प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराने सगळेच हैराण झालेत.
डोनाल्ड ट्रम्प उत्तर देताना म्हणाले की, “मला विश्वास नाहीय! हे आमचं युद्ध नाहीय. हे त्यांचं युद्ध आहे. मला विश्वास नाहीय” इस्रायल-हमास डील ट्रम्प यांनी घडवून आणलीय असं अमेरिकेच्या 60 टक्के मतदारांच मत आहे. डील टीकून राहण्याविषयी ट्रम्प यांनी केलेलं वक्तव्य कोणाला पचत नाहीय. “मी गाझाचा फोटो बिघतला. ते एका विशाल विद्धवंस स्थळासारखं वाटतय. असं वाटतय की, ते नव्याने बनवलं पाहिजे” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. “गाझाचे समुद्र किनारे एक शानदार जागा आहे. तिथे हवामान उत्तम असतं. तिथे काही चांगलं करता येऊ शकतं” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
मागच्या कार्यकाळात चार देशांसोबत घडवून आणलेली डील
डोनाल्ड ट्रम्प यांनी जे उत्तर दिलं, त्याची कोणालाच अपेक्षा नव्हती. आपल्या मागच्या कार्यकाळात ट्रम्प यांनी इस्रायलची चार अरब देशांसोबत डील घडवून आणली होती. त्यांच्या येण्याने अशी अपेक्षा आहे की, ते इस्रायलसाठी गाझाकडून असलेला धोका कमी करतील. पण ट्रम्प यांनी असं बोलून इस्रायलला धक्का दिला आहे. ‘हे आमचं युद्ध नाही, हे त्यांचं युद्ध आहे’