कोलंबो- आर्थिक संकटानंतर सामान्य श्रीलंकन नागरिकांचे सरकारविरोधातील आंदोलन तीव्र झाले आहे. राष्ट्रपती भवनावर (Rashtrpati Bhavan) चालून गेलेल्या आंदोलकांनी, आता पंतप्रधान विक्रमसिंघे (PM Vikramsinghe)यांचे घर जाळले (house set on fire)आहे. रानील विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी हे कृत्य केले आहे. यावेळी सुरक्षा दलाने केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत 6 पत्रकारांसह 64 जण जखमी झाल्याची माहिती आहे. दुपारी राष्ट्रपती निवासावर आंदोलनकर्त्यांनी कब्जा केला. त्यानंतर राष्ट्रपती राजपक्षे यांनी पलायन केल्याची माहिती आहे. ते सध्या कुठे आहेत, याची माहिती कुणाकडेच नाही. ते श्रीलंकेत आहेत की बाहेरच्या देशात गेलेत हेही माहीत नाही. 13 जुलैला ते राजीनामा देणार अशी माहिती आहे.
Chaos reigns in Sri Lanka. Now, protestors have set the private residence of PM Ranil Wickremesinghe on fire. Take a look: pic.twitter.com/nOThbWzALD
हे सुद्धा वाचा— Steve Hanke (@steve_hanke) July 9, 2022
To ensure the continuation of the Government including the safety of all citizens I accept the best recommendation of the Party Leaders today, to make way for an All-Party Government.
To facilitate this I will resign as Prime Minister.
— Ranil Wickremesinghe (@RW_UNP) July 9, 2022
दुपारी राष्ट्रपती भवनावर आंदोलकांच्या कब्ज्यानंतर पंतप्रधानावंर दबाव वाढला. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आले नाही. राजीनाम्यापूर्वी त्यांनी आपत्कालीन बैठक बोलावली. त्यात संसदेच्या सभापतींना अंतरिम राष्ट्रपती करण्याचा प्रस्ताव ठेवला. श्रीलंकेच्या घटनेनुसार राष्ट्रपतींनी राजीनामा दिल्यानंतर एक महिना लोकसभा सभापती अंतरिम राष्ट्रपती म्हणून पद सांभाळू शकतात. त्यानंतर त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. त्यानंतर संतप्त आंदोलकांनी संध्याकाळी त्यांच्या घरावर हल्ला करत, त्यांचे घर जाळून टाकले आहे.
शनिवारी आंदोलनकर्त्यांनी थेट राष्ट्रपती भवनावरच मोर्चा वळवला. त्यामुळे राष्ट्रपती गोयबाया राजपक्षे यांना निवासस्थान सोडून पलायन करण्याची वेळ आली. यापूर्वी मे महिन्यातही नागरिकांच्या उद्रेकात राजपक्षे यांचे लहान भाऊ माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या निवासस्थानाबाहेरही आंदोलकांनी घेराव घातला होता. त्यावेळी राजपक्षे कुटुंबीयांनी पळ काढत नेव्हल छावणीत आसरा घेतला होता. राजपक्षे कुटुंबीयांमुळेच देशावर ही वेळ आल्याचा आंदोलकांचा आक्षेप आहे. राजपक्षे परिवाराने 5.31 अब्ज डॉलर्स म्हणजेच 42 हजार कोटी रुपये देशातून बाहेर नेले, असा आरोप आहे.
राष्ट्रपती भवन ताब्यात घेतल्यानंतर आंदोलकांनी तिथे धुडगूस घातला. राष्ट्रपती भवनातील शाही स्विमिंगपूलमध्ये अनेक जण उतरले. राष्ट्रपती निवासस्थानातील किचनमध्ये गर्दीने अनेक पदार्थांवर तावमारला. तसेच राष्ट्रपती भवनातील खोल्यांमध्येही हे आंदोलक शिरले आणि त्यांनी तिथे आरामही केला.