9 महिन्यांची दीर्घ प्रतिक्षा अखेर संपुष्टात आली आहे. सुनीता विलियम्स निक हेग, बुच विल्मोर आणि अलेक्जेंडर गोर्बुनोव यांच्यासोबत पृथ्वीवर सुरक्षित परतल्या आहेत. स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टद्वारे सर्वांना पृथ्वीवर आणण्यात आलं. लँडिंग झाल्यानंतर ड्रॅगन स्पेसक्राफ्टमधून बाहेर येताच सुनीता विलियम्स, निक हेगसह सर्व अंतराळवीरांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ड्रॅगन स्पेसक्राफ्टच्या यशस्वी लँडिंगनंतर सुनीता विलियम्ससह सर्व अंतराळवीरांना एक-एक करुन बाहेर काढण्यात आलं. यानातून बाहेर येताच सुनीता विलियम्सने कॅमेऱ्याकडे पाहून हसली आणि हात हलवला. तिच्या चेहऱ्यावर 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतल्याचा आनंद स्पष्टपणे दिसत होता.
स्पॅलशडाऊन साइटच्या जवळपास तैनात केलेल्या रिकव्हरी शिपमधील दोन स्पीड बोट ड्रॅगन कॅप्सूलमधील अंतराळवीरांच्या मदतीसाठी लगेच तिथे पोहोचल्या. त्यांना बाहेर येण्यासाठी मदत केली. कॅप्सूलची तपासणी पूर्ण झाल्यानंतर ड्रॅगनचे दरवाजे उघडून अंतराळवीरांना बाहेर काढलं. सर्वप्रथम निक हेग हे स्पेसक्राफ्टच्या कॅप्सूलमधून बाहेर आले. कॅप्सूलमधून बाहेर येताच निक हेग यांनी कॅमेऱ्याच्या दिशेने हात हलवून आपला आनंद व्यक्त केला.
एकूण किती जण परतले?
सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर हे मागच्या नऊ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर अडकले होते. बोईंगच्या यानात अचानक बिघाड झाला. त्यामुळे काही आठवड्यांच हे मिशन काही महिन्यांमध्ये बदललं. सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर हे आज इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या स्पेसक्राफ्टने पृथ्वीवर परतले. विलियम्स आणि विल्मोर यांच्यासह अन्य दोन अंतराळवीर सुद्धा मिशन संपवून पृथ्वीवर परतले आहेत.
#WATCH | Being stranded at the International Space Station for 9 months, Sunita Williams is back on Earth with a smile
Today, NASA’s SpaceX Crew-9 – astronauts Nick Hague, Butch Wilmore, Sunita Williams, and Roscosmos cosmonaut Aleksandr Gorbunov returned to Earth after the… pic.twitter.com/mdZIQTG4SN
— ANI (@ANI) March 18, 2025
स्पॅलशडाऊन म्हणजे काय?
स्पेसएक्सच कॅप्सूल सोमवार-मंगळवार दरम्यान रात्री एक वाजण्याच्या सुमारास आंतरराष्ट्रीय अवकाश तळावरुन निघालं. हवामान अनुकूल असल्याने अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर फ्लोरिडा येथे पाच वाजून 57 मिनिटांनी भारतीय वेळेनुसार बुधवारी रात्री 3 वाजून 27 मिनिटांनी स्पॅलशडाऊन केलं. अवकाश यानाच्या लँडिंगला स्पॅलशडाऊन म्हणतात.