UAE नंतर आता या मुस्लीम देशात बांधले जाणार हिंदू मंदिर, देशाच्या युवराजांनी दिली परवानगी

| Updated on: Feb 14, 2024 | 5:58 PM

Hindu Temple : यूएईमध्ये पहिले हिंदू मंदिर बांधण्यात आले आहे. अबुधाबी येथे बांधण्यात आलेल्या या मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे, यूएईमध्ये बांधण्यात आलेल्या या हिंदू मंदिराचे फक्त भारतातच नाही तर जगभरात चर्चा आहे. आता आणखी एका मुस्लीम देशात मंदिर बांधले जाणार आहे.

UAE नंतर आता या मुस्लीम देशात बांधले जाणार हिंदू मंदिर, देशाच्या युवराजांनी दिली परवानगी
Follow us on

अबुधाबी : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर युएई दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते अबुधाबीतील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. मंगळवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदी यांनी भारतीय समुदायाला संबोधित केले होते. UAE-भारत संबंधांवरही त्यांनी यावेळी वक्तव्य केले. यूएई मध्ये पहिले हिंदू मंदिर बांधण्यात आले आहे. अबुधाबीमध्ये बांधलेल्या या भव्य मंदिराची जगभरात चर्चा आहे. ज्याचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे.

आणखी एका मुस्लीम देशात बांधणार मंदिर

UAE नंतर आणखी एक मुस्लीम देशात हिंदू मंदिर बांधले जाणार आहे. हे मंदिर देखील अबुधाबीच्या मंदिरासारखे भव्य असणार आहे. अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था म्हणजेच BAPS हे मंदिर बांधणार आहे. मंदिराच्या बांधकामाबाबत BAPS शिष्टमंडळाची बहरीनच्या राज्यकर्त्यांसोबत बैठकही झाली आहे. त्यानंतर मंदिरासाठीची जमीन बहरीन सरकारने आधीच दिली आहे आणि आता बांधकाम सुरू करण्याची औपचारिकताही पूर्ण झाली आहे.

1 फेब्रुवारी 2022 रोजी बहरीनचे क्राउन प्रिन्स सलमान बिन हमाद अल खलिफा यांनी हिंदू मंदिर बांधण्यासाठी जमीन देण्याची घोषणा केली होती. स्वामी अक्षरती दास, डॉ. प्रफुल्ल वैद्य, रमेश पाटीदार आणि महेश देवजी यांच्या शिष्टमंडळाने मंदिराच्या बांधकामासंदर्भात त्यांची भेट घेतली. BAPS ने सांगितले आहे की मंदिराचा उद्देश सर्व धर्मातील लोकांचे स्वागत करणे, विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक उपक्रमांसाठी जागा उपलब्ध करून देणे आहे.

पीएम मोदी आणि बहरीनचे युवराज यांचे मानले आभार

BAPS गुरु महंत स्वामी महाराज यांनी भारताचे पंतप्रधान आणि बहरीनचे युवराज यांचे बहरीनमधील मंदिराच्या भूमीबद्दल आभार मानले असून ते दोन्ही देशांमधील धार्मिक सलोख्याचे घनिष्ठ संबंध आणि चिरंतन विश्वास अधोरेखित करते. ते म्हणाले की मंदिराचे काम लवकर पूर्ण व्हावे आणि लाखो लोकांना त्याच्या बांधकामाद्वारे शांती मिळावी यासाठी मी मनापासून प्रार्थना करतो.

याआधी अबुधाबीमध्ये देखील BAPS ने मंदिर बांधले आहे. ज्याचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज लोकार्पण होणार आहे.