जेनिन – पॅलेस्टाईनच्या ताब्यात असलेल्या वेस्ट बँकमध्ये (west bank Palestine) बुधवारी पहाटे एका महिला पत्रकाराचा गोळी लागल्याने मृत्यू झाला. पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या महिला पत्रकार शिरीन अबू अकलेह (AlJazeera reporter Shireen Abu)या अल जजिरा वृत्तवाहिनीच्या पत्रकार होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. गोळी लागल्यानंतर घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी जेनिन शहरात इस्रायलने घातलेल्या छाप्याच्या बातमीने वृत्तांकन त्या करत होत्या. वेस्ट बँकेमध्ये उत्तरेल्या असलेल्या जेनिन शहरात इस्रायली सैन्याने (Israeli military)छापा घातला होता. यावेळी झालेल्या गोळीबारात एक गोळी या महिला पत्रकाराला लागली. इस्रायली सैन्यदलाने केलेल्या गोळीबारात या महिला पत्रकाराचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर इस्रायल सैन्याने हे आरोप फेटाळले आहेत. सैन्याने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात, बुधवारी संशयितांमध्ये आणि सैन्यदलात चकमक झाल्याचे मान्य करण्यात आले आहे. मात्र पॅलेस्टाईनींनी केलेल्या गोळीबारात या पत्रकाराचा बळी गेल्याची शक्यता इस्रायली सैन्याने व्यक्त केली आहे. या प्रकरणाची चौकशी इस्रायली सैन्याकडून करण्यात येत आहे.
AlJazeera journalists & other Palestinian reporters at the scene say veteran @AJArabic reporter Shireen Abu wallah was ´killed in cold blood’ by Israeli forces as she reported on an Israeli raid on Jenin refugee camp. pic.twitter.com/RRsP3PY7GF
हे सुद्धा वाचा— Arwa Ibrahim (@arwaib) May 11, 2022
शिरीन या अल जजिरा वृत्तवाहिनीच्या नावाजलेल्या पत्रकार होत्या. गेल्या १५ वर्षांपासून त्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षाच्या बातम्यांचे वृत्तांकन करीत होत्या. त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरही ही माहिती आहे. यरुशलम येथील अल–कुद्स वृत्तपत्रासाठी काम करणारा अजून एक पत्रकारही या गोळीबारात जखमी झाला आहे. या पत्रकाराची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
अल जजिरा वृत्त वाहिनीने याबाबत पत्रक काढून इस्रायली सैन्यावर हत्येचा आरोप केला आहे. हा एक कोल्ड ब्लडेड खून होता, असा आरोप अल जजिरा या वाहिनीने केला आहे. अल जजिराने पत्रकात लिहिले आहे – इस्रायल सैन्य जाणीवपूर्वक पत्रकारांना लक्ष्य करीत आहे. असे करुन आंतरराष्ट्रीय कायद्यांचे खुलेआम उल्लंघन करण्यात येत आहे. या मृत्यूसाठी इस्रायल सैन्याला जबाबदार धरण्यात यावे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय समुदायाला अल जजिरातर्फे करण्यात आले आहे.
इस्रायल सैन्याने मात्र पत्रकारांना लक्ष्य करत असल्याच्या आरोपाचा इन्कार केला आहे. इस्रायलचे परराष्टमंत्री यायर लापिड यांनी शिरीन यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे. या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. शिरीन यांच्या मृत्यूप्रकरणाची पॅलेस्टिनी प्रशासनासोबत संयुक्त चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.