मुंबई : अल कायदा (Al Qaeda) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा मृत्यू झाल्यानंतर संघटनेत दोन नंबरचा सर्वोच्च नेता असलेला अयमान अल जवाहिरी (Al Zawahiri) अद्याप जीवंत (alive) असल्याचे समोर आले आहे. आपल्या दहशतवादी कृत्यामुळे जगातील अनेक देशांच्या टार्गेटवर असलेला जवाहिरीचा 2020 मध्ये मृत्यू झाल्याची एक बातमी प्रसिध्द झाली होती. त्यामुळे खरंच जवाहिरीचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु जवाहिरीचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा त्याचा ताजा व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे. भारतात सुरु असलेल्या हिजाबच्या वादावर (Hijab Controversy) तो बोलला आहे. त्याने संबंधित मुस्लीम मुलीची पाठराखण केल्याचे व्हिडीओतून दिसत आहे.
कर्नाटक राज्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यास बंदी करण्यात आली होती. त्यावरुन त्या ठिकाणी मोठा वाद सुरु झाला होता. या निर्णयाचे स्वागत करणाऱ्यांना जवाहिरीने ‘इस्लामचे दुश्मन’ असे म्हणत त्यांचा निषेध केला आहे. जवाहिरीचा या आधीचा शेवटचा व्हिडिओ 9/11 दहशतवादी हल्ल्याच्या 20 व्या वर्षानिमित्त बनविण्यात आला होता. दरम्यान, तुम्हाला हे एकूण आश्चर्य वाटेल की, कुख्यात दहशतवादी जवाहिरी हा एक डॉक्टर असून त्याचा जन्म मिस्रमध्ये झाला आहे. 2011 मध्ये लादेनाचा मृत्यू झाल्यानंतर त्याने अल कायदावर आपले वर्चस्व निर्माण केले आहे.
अल कायदाची अधिकृत मीडिया विंग असलेल्या अल साहाब मीडियाने एक नऊ मिनिटांचा व्हिडिओ प्रसारीत केला आहे. ज्यात अल जवाहिरी कर्नाटकातील मुस्कान नावाच्या त्या मुस्लीम मुलीचे कौतुक करताना दिसत आहे. कर्नाटकात मुस्कान हिजाब घालून आल्यानंतर जो वाद ओढावून त्या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाला त्यावर त्याने तिचे कौतुक केल्याचे दिसत आहे. जवाहिरीने फ्रांस, हॉलंड, स्वित्झर्लंड सोबतच मिस्र आणि मोरक्कोलादेखील हिजाब विरोधी भूमिकांमुळे ‘इस्लामचे दुश्मन’ म्हटले आहे.
कर्नाटकात हिजाबवरुन वाद पेटलेला असतानाच मुस्कानचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ती महाविद्यालयात हिजाब घालून येत असताना परिसरात उभे काही मुलं ‘जय श्री राम’ची घोषणा देत होते. त्यावर उत्तर म्हणून मुस्कानने ‘अल्हा हू अकबर’ची घोषणा दिली होती. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, अल कायदाने व्हिडिओला ‘भारत की महान महिला’या नावाने प्रसिध्द केला आहे. ज्यात जवाहिरी एक कविता वाचून मुस्कानचे कौतुक करत आहे.
इतर बातम्या