इस्माईल हनियाच्या हत्येनंतर इस्रायलमध्ये अलर्ट, इराणकडून हल्ल्याची शक्यता

| Updated on: Jul 31, 2024 | 7:49 PM

इस्रायलने हमासचा खात्मा करण्याची शपथ घेतली होती. हमासने सुरु केलेले युद्ध आम्ही संपवू असे इस्रायलच्या पंतप्रधानांनी आधीच जाहीर केले होते. इस्रायलने हमासचे प्रमुख इस्माईल हनिस यांची हत्या केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे इराणकडून आता या हत्येचा बदला घेतला जावू शकतो.

इस्माईल हनियाच्या हत्येनंतर इस्रायलमध्ये अलर्ट, इराणकडून हल्ल्याची शक्यता
Follow us on

हमासचे राजकीय नेते इस्माईल हनिया यांच्या पार्थिवावर कतारमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. इराणहून ते दोहा येथे पाठवण्यात आले असून येथेच शुक्रवारी पार्थिव दफन केले जाणार आहे. इराण आणि हमासच्या प्रतिउत्तराच्या भीतीने इस्रायलने आपली सुरक्षा वाढवली आहे. इस्माईल हनियाच्या मृत्यूला चोख प्रत्युत्तर देऊ असं इराणी लष्कराने म्हटलं आहे. इराणचे लष्कर IRGC ने हमास प्रमुख इस्माईल हनिया यांच्या मृत्यूचा बदला घेणार असल्याची घोषणा करुन टाकली आहे. IRGC ने या हत्याकांडाचा तीव्र निषेधही केलाय. इराणच्या लष्कराने या हत्याकांडासाठी इस्रायलवर आरोप केला आहे.

इस्रायलकडून बदला घेऊ, खामेनी यांची घोषणा

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी हमास प्रमुख इस्माईल हनिया यांच्या मृत्यूवर इराण इस्रायलकडून याचा बदला घेईल, असे म्हटले आहे. खामेनी म्हणाले की, ज्यू राजवटीच्या या गुन्हेगारी आणि दहशतवादी पावलामुळे कठोर शिक्षेचा मार्ग खुला झाला आहे. आमच्या मातीत मरण पावलेल्या हानियाला न्याय मिळणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.

इराणच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलला धमकी

हमास प्रमुख इस्माईल हनिया यांच्या हत्येनंतर इराणचे नवे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी इस्रायलला उघडपणे धमकी दिली आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की त्यांचा देश याला चोख प्रत्युत्तर देईल. इराणच्या नेत्याने सांगितले की ते आपल्या प्रादेशिक अखंडतेचे आणि सन्मानाचे रक्षण करेल. दहशतवाद्यांना (इस्रायल) त्यांच्या कृत्याची किंमत चुकवावी लागेल, असे ही त्यांनी म्हटले आहे.

हानिया यांच्या मृत्यूला अमेरिका जबाबदार – इराण

इस्रायलला पाठिंबा देणारी अमेरिका हमासचा नेता इस्माईल हनियाच्या हत्येला जबाबदार असल्याचे इराणने म्हटले आहे. गाझामधील पॅलेस्टिनी लोकं ही हनियाच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत आहेत. हानियाच्या मृत्यूमुळे आता युद्धविराम होणं कठीण झालं आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांच्याशी चर्चा केली. असे पेंटागॉनने म्हटले आहे.

इस्रायलचे परराष्ट्र मंत्री इस्रायल कॅटझ यांनी अनेक देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांना पत्र पाठवून ‘हिजबुल्लाहचे हल्ले तात्काळ थांबवावेत, लितानी नदीच्या उत्तरेकडून माघार घ्यावी आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठराव 1701 नुसार नि:शस्त्रीकरण करावे’ असे आवाहन केले आहे.