न्यूयॉर्क : अमेरिकेने अटलांटिक महासागरात चिनीचा हेरगिरी करणारा फुगा क्षेपणास्त्राने फोडाला. यानंतर चीनचा थयथयाट सुरु झाला. या प्रकारावरुन दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले आहे. अमेरिकन हवाई दलाच्या F-22 विमानाने AIM-9X SIDEWINDER या क्षेपणास्त्राने हा फुगा पाडला. या एका क्षेपणास्त्राची किंमत साडेतीन कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बियडेन यांनी या मिशनमध्ये सहभागी असलेल्या पायलटचे अभिनंदन केले. चीनने हा फुगा आपलाच असल्याचे मान्य केले आहे. मात्र तो टेहळणीसाठी अमेरिकेत पाठविल्याच्या आरोपाचा इन्कार केला. हा फुगा नागरी संशोधनासाठी सोडण्यात आला होता.
वातावरण बदलांबाबत संशोधनाचा तो एक भाग होता. मात्र त्यावरील नियंत्रण सुटल्यामुळे भरकटला आणि मोंटानाच्या आकाशात पोहोचला. चीनचे हे स्पष्टीकरण अर्थातच अमेरिकेने स्वीकारले नाही.
फुगा पाडणारा क्षेपणास्त्र काय आहे
यूएस F-22 लढाऊ विमानाने चिनी हिरगिरी फुग्याला मारण्यासाठी AIM-9X साइडवाइंडर क्षेपणास्त्राचा वापर केला. AIM-9X SIDEWINDER हे अमेरिकेचे हवेतून हवेत मारा करणारे सर्वात प्रगत क्षेपणास्त्र आहे. हे अमेरिकन शस्त्रास्त्र निर्माता रेथिऑनने विकसित केले आहे. या क्षेपणास्त्राचा वापर यूएस एअर फोर्स आणि नेव्ही करते. हे क्षेपणास्त्र आपले लक्ष्य शोधण्यासाठी इन्फ्रारेड तंत्रज्ञानाचा वापर करते. हे क्षेपणास्त्र सध्या जगभरातील 24 पेक्षा जास्त देशांच्या सैन्याच्या सेवेत आहे. नाटो सदस्य देश आणि अमेरिकेशी संबंधित इतर देशांना त्याचा पुरवठा केला जातो.
असा झाला क्षेपणास्त्राचा विकास
यूएस नेव्ही आणि यूएस एअर फोर्सच्या संयुक्त कार्यक्रमाचा भाग म्हणून AIM-9X चा विकास सुरू झाला. या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी मार्च 1999 मध्ये करण्यात आली होती. यानंतर 1999 ते 2000 दरम्यान यूएस नेव्हीच्या F/A-18 लढाऊ विमान आणि वायुसेनेच्या F-15 लढाऊ विमानातून क्षेपणास्त्राच्या 13 प्रगत चाचण्या घेण्यात आल्या.
क्षेपणास्त्र लॉक-ऑन-आफ्टर-लाँच तंत्रज्ञानानेही सुसज्ज आहे. AIM-9X ब्लॉक II मध्ये पुन्हा डिझाइन केलेले फ्यूज आणि एक दिशाहीन फॉरवर्ड-क्वार्टर डेटा-लिंक आहे. डेटालिंक दृष्य श्रेणीच्या पलीकडे लक्ष्यांना व्यस्त ठेवण्यास सक्षम करते.यूएस नेव्हीच्या मंजुरीनंतर सप्टेंबर 2015 मध्ये AIM-9X साइडवाइंडर ब्लॉक II इन्फ्रारेड एअर-टू-एअर क्षेपणास्त्राचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झाले.
साडेतीन कोटी किमत
अमेरिकेच्या आकाशात दिसणारा भला मोठा फुगा अखेर पाडण्यात आला आहे. पांढऱ्या रंगाच्या या फुग्यामुळे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी आपला चीन दौरा रद्द केलाय. कारण हा फुगा चिनी बनावटीचा होता. चीनने अमेरिकेत हेरगिरी करण्यासाठी हा फुगा सोडल्याचा आरोप करण्यात आला. चीनने हा फुगा (फ्लाइंग बलून) आपलाच असल्याचे मान्य केले असताना तो पाडल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. परंतु याची किमत साडेतीन कोटी आहे.