Afghanistan Photo : पोलादी हातात चिमुकली बाळं, सैन्यांकडून लेकरांसाठी छातीचा कोट, हृदय पिळवटून टाकणारे फोटो
अफगाणिस्तानमध्ये तालिबानने कब्जा केल्यानंतर अनेक हेलावून टाकणारी दृष्ये समोर आलीत. यात सर्वसामान्य अफगाण नागरिकांच्या हालअपेष्टा पाहायला मिळत आहेत. मात्र, आता अमेरिकेच्या सैन्याने जारी केलेल्या काही फोटोंमध्ये या संकटात अमेरिकन सैनिक अफगाणमधील लहान मुलांना मदत करताना दिसत आहेत.
1 / 7
अफगाणिस्तानमध्ये तालिबानने कब्जा केल्यानंतर अनेक हेलावून टाकणारी दृष्ये समोर आलीत. यात सर्वसामान्य अफगाण नागरिकांच्या हालअपेष्टा पाहायला मिळत आहेत. मात्र, आता अमेरिकेच्या सैन्याने जारी केलेल्या काही फोटोंमध्ये या संकटात अमेरिकन सैनिक अफगाणमधील लहान मुलांना मदत करताना दिसत आहेत. ही मदतीची दृष्ये काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आहेत. अमेरिकेच्या सैन्यासोबत यात ब्रिटीश आणि तुर्कीश सैन्यही सहभागी आहेत.
2 / 7
अफगाणिस्तानमधील परिस्थितीचं आणि त्यात लहान मुलांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाचं प्रातिनिधिक उदाहरण म्हणून एक फोटो आणि व्हिडीओ जगभरात चर्चेचा केंद्र बनत आहे. यात या चिमुरड्याचे कुटुंबीय त्याला अफगाणमधून सुरक्षित दुसऱ्या देशात नेण्यासाठी अटीतटीचे प्रयत्न करत सुरक्षा भिंतीवरुन त्याला नेण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी विमानतळावर सुरक्षेसाठी थांबलेल्या अमेरिकन सैन्याने या मुलाला काटेरी कंपणाच्या दुसऱ्या बाजूवरुन आत घेतलं. यामुळे अमेरिकन सैन्याचं मदतीसाठी चांगलंच कौतुकही होत आहे.
3 / 7
या फोटोत काबुल विमानतळावर एका तहान्या मुलाला शांत करतानाही हे बचाव आणि मदत मोहिमेतील सैनिक दिसत आहेत.
4 / 7
या फोटोत सैन्याने आपल्या बचाव आणि मदत मोहिमेंतर्गत लहान मुलांना वाचवत त्यांना त्यांच्या कुटुंबाकडे सोपावल्याचं दिसत आहे.
5 / 7
या फोटोत अफगाणमधील परिस्थितीतून स्वतःला वाचवत दुसऱ्या देशात जाण्यासाठी विमानाची वाट पाहताना ही मुलं दिसत आहेत. (Photos : AP/PTI)
6 / 7
या फोटोत बचाव दलाचे सैनिक लहान मुलांसोबत खेळत त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. (Photos : AP/PTI)
7 / 7
लहान मुलांचे अफगाणमधील काटेरी कुंपणाभोवतीचे फोटो अनेकांच्या मनाला चटका लावत आहेत. मात्र, त्यातही सैनिकांकडून होणारी मदत या परिस्थितीतही आशेचा किरण ठरत आहे.