अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यानंतर पहिल्यांदाच भारताच्या उच्च स्तरीय शिष्ट मंडळाने तालिबानसोबत बैठक केली. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी दुबईमध्ये अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान यांची भेट घेतली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार तालिबानने भारताच्या सुरक्षेबद्दल संवेदनशीलता व्यक्त केली आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तान तणावाने टोक गाठलेला असताना दुबईत ही महत्त्वाची बैठक पार पडली आहे. दुसऱ्याबाजूला पाकिस्तानचे बांग्लादेशसोबत संबंध मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सध्याच्या स्थितीत भारत-तालिबानच एकत्र येणं, पाकिस्तानसाठी चिंतेचा विषय आहे.
“दोन्ही पक्षांनी अफगाणिस्तानला दिली जाणारी मानवी सहाय्यता, द्विपक्षीय मुद्दे आणि क्षेत्राच्या सुरक्षा स्थितीबद्दल चर्चा केली” असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी सांगितलं. अफगाणी नागिरकांचा विकास आणि मानवी सहाय्यता प्रदान करण्यासाठी कटिबद्ध असल्याच भारताने म्हटलं. चाबहार बंदराच्या माध्यमातून व्यापार वाढवण्यावर एकमत झालं.
या बैठकीमुळे काय होईल?
भारत आणि अफगाणिस्तानचे पूर्वीपासून मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. भारताने मोठ्या प्रमाणात अफगाणिस्तानात गुंतवणूक केली आहे. तिथल्या संसदेसह अनेक इमारती भारताने बनवल्या आहेत. 2021 साली तालिबानने काबूल ताब्यात घेतल्यानंतर भारताने तिथला आपला दूतावास बंद केला. जगातील अन्य देशांप्रमाणे भारताने सुद्धा अजून अफगाणिस्तानातील सरकारला मान्यता दिलेली नाही. दुबईतील भेटीनंतर भविष्यात हे दोन्ही देश अजून एकमेकांच्या जवळ येऊ शकतात.
क्रिकेटवर चर्चा
भारत आणि अफगाणिस्तानात क्रिकेट सारख्या खेळांमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली. भारत दीर्घकाळापासून अफगाणिस्तान क्रिकेट टीमच होम ग्राऊंड आहे. त्याशिवाय नियमित संपर्क ठेवण्याचा आणि विभिन्न स्तरावर संवाद कायम ठेवण्यावर सहमती व्यक्त केली.
Foreign Secy @VikramMisri met Acting Foreign Minister of Afghanistan Mawlawi Amir Khan Muttaqi in Dubai today.
Both sides discussed 🇮🇳’s ongoing humanitarian assistance to Afghanistan, bilateral issues and security situation in the region. India reiterated its commitment to… pic.twitter.com/a3UyuIqkAG
— Randhir Jaiswal (@MEAIndia) January 8, 2025
भारताने आतापर्यंत काय मदत केलीय?
भारताने मागच्या काही वर्षात अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात मानवी सहाय्यता केली आहे. यात 50 हजार मेट्रिक टन गहूं, 300 टन औषधं, 27 टन भूकंपापासून वाचवणारं साहित्य, 40 हजार लीटर कीटनाशक, 1 कोटी पोलियो डोस, 1.5 मिलियन कोविड-19 वॅक्सीन डोस, 11 हजार हायजीन किट्स आणि 1.2 टन स्टेशनरी किट्सचा समावेश आहे.