‘या’ देशांनी वायफळ बडबड आता थांबवावी, अन्यथा… शक्तीशाली अण्वस्त्र पाणबुडी आखातामध्ये दाखलं

| Updated on: Nov 07, 2023 | 2:34 PM

Israel-Hamas War | सर्वात घातक, अण्वस्त्र हल्ला करण्याची क्षमता असलेली पाणबुडी आखाताच्या समुद्रात दाखल झाली आहे. वायफळ, धमक्यांची भाषा करणाऱ्या देशांसाठी हा एक मोठा इशारा आहे. कारण 154 टॉम हॉक मिसाइल्स आणि 24 ट्रायडेंट मिसाइल एकाचवेळी या पाणबुडीतून डागता येऊ शकतात.

या देशांनी वायफळ बडबड आता थांबवावी, अन्यथा... शक्तीशाली अण्वस्त्र  पाणबुडी आखातामध्ये दाखलं
Israel-Hamas War
Follow us on

वॉशिंग्टन : इस्रायल-हमास युद्धा दरम्यान अमेरिकेने मिडिल ईस्टमध्ये आपली अण्वस्त्र पाणबुडी तैनात केली आहे. हिजबुल्लाहकडून इस्रायलला सतत धमक्या दिल्या जात आहेत, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. इस्रायलवर हिजबुल्लाह किंवा अन्य कोणी हल्ला केला, तर त्याच उत्तर इस्रायलसोबत अमेरिका सुद्धा देईल. ही ओहियो पाणबुडी आहे, जी खूप घातक आहे. ही पाणबुडी हायटेक टॉम हॉक क्रूज मिसाइलने सुसज्ज आहे. शत्रुच्या घरात घुसून त्याला संपवण्याची या पाणबुडीची क्षमता आहे. यूएस सेंट्रल कमांडकडून सोशल मीडियावर ही घोषणा करण्यात आलीय. ओहियो श्रेणीची ही पाणबुडी आहे. ती मिडिल ईस्टमध्ये पोहोचली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन मिडिल ईस्टच्या दौऱ्यावर आहेत.

त्यांनी आखातामध्ये आतापर्यंत इस्रायल, वेस्ट बँक, इराक, जॉर्डन, सायप्रस, टर्की आदि देशांचे दौरे केले आहेत. अमेरिकेची ही घातक पाणबुडी एकाच हल्ल्यात शत्रूची धुळधाण उडवू शकते. मिडिल ईस्टमध्ये तैनात ओहियो पाणबुडी खतरनाक आहे. अणूऊर्जेवर ही पाणबुडी चालते. शत्रू प्रदेशात घुसून खोलवर हल्ला करण्याची या पाणबुडीची क्षमता आहे. अमेरिकेने तैनात केलेल्या या पाणबुडीवर 154 टॉम हॉक मिसाइल्स आणि 24 ट्रायडेंट मिसाइल तैनात केली जाऊ शकतात. ही पाणबुडी अनेक महिने पाण्याखाली राहू शकते.

किती हजार किलो स्फोटक या पाणबुडीत राहू शकतात?

या पाणबुडीत ऑक्सिजन जनरेटर आहेत. पाणबुडीवर तैनात असणाऱ्या नौसैनिकांसाठी त्यातून ऑक्सिजन निर्मिती होते. टॉम हॉक मिसाइल आपल्यासोबत एक हजार किलोपेक्षा जास्त स्फोटके वाहून नेऊ शकतात. ट्रायडेंट मिसाइल अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. अण्वस्त्र रिएक्टरवर ही पाणबुडी चालते. यात दोन टर्बाइन आहेत.


अमेरिकेने थेट कुठल्या देशाला इशारा दिला?

अमेरिकेच हे खूपच धोकादायक अस्त्र आहे. या पाणबुडीच्या तैनातीमुळे आखातमधील सगळेच देश हैराण झाले आहेत. अमेरिकन पाणबुडी समुद्रात आहे, हे फारस कोणाला कळत सुद्धा नाही. इराणला स्पष्ट संदेश देणं, हा या पाणबुडीच्या तैनातीमागे अमेरिकेचा उद्देश आहे. इराणने संघर्ष अधिक वाढणार असा इशारा दिला होता.