प्रसिद्ध उद्योगपती नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह नुकताच पार पडल्यानंतर आता दोघेही हनीमुनला फिरायला गेले आहेत. अनंतच्या लग्नासाठी अंबानी कुटुंबाने करोडो रुपये खर्च केले. लग्न सोहळा इतका मोठा होता की, अनेक सेलिब्रिटींपासून जगभरातील उद्योजक आणि अनेक मान्यवरांनी या लग्नाला हजेरी लावली होती. अनंतला आता आणखी एक सरप्राईज मिळाले आहे. अनंत अंबानीचे लग्न कायम स्मरणाक राहिल अशा पद्धतीने केल्यानंतर अंबानी कुटुंबाने अनंत आणि राधिकाला दुबईतील एक आलिशान बीच व्हिला गिफ्ट म्हणून दिला आहे.
एप्रिल 2022 मध्ये मुकेश अंबानी यांनी दुबईतील पाम जुमेराहच्या पॉश भागात बीच-साइड व्हिला विकत घेतला होता. जो 3000 स्क्वेअर फूटमध्ये पसरला आहे. व्हिलामध्ये 10 बेडरूम आणि 70 मीटर खाजगी बीच आहे. या व्हिलाची किंमत करोडो रुपयांमध्ये आहे. असं म्हणतातकी, मुकेश अंबानी यांनी हा व्हिला 640 कोटी रुपयांना खरेदी केला आहे. दुबईमधील हा दुसरा सर्वात मोठा निवासी मालमत्तेचा सौदा आहे.
या व्हिलाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, हा खूपच आलिशान आहे. ज्यामध्ये इटालियन संगमरवरी आणि आकर्षक कलाकृती आहेत. सुट्टी घालवण्यासाठी तो तयार करण्यात आला आहे. घरात आलिशान इंटीरियरचे काम केले असून आधुनिक बेडरूम्स देखील आहेत. मोठ्या डायनिंग टेबलसह जेवणाची खोली. एवढेच नाही तर या घरात एक इन-बिल्ट पूल देखील आहे.
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी अनंत आणि राधिकाच्या लग्नसोहळ्यावर तब्बल 1259 कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे. दोघांनी जुलै 2024 मध्ये लग्न केले. अनंत आणि राधिकाची 2023 मध्ये एंगेजमेंट झाली होती. तेव्हा मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी जोडप्याला ‘बेंटले कॉन्टिनेंटल जीटीसी स्पीड’ भेट देऊन आश्चर्यचकित केले होते, ज्याची किंमत 4.5 कोटी आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह मुंबईतील जिओ सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. या विवाह सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेते, कलाकार आणि इतर मान्यवरांनी हजेरी लावली होती.