खार्तूम : सुदानमध्ये सुमारे 2700 वर्षे जुन्या मंदिराचे अवशेष सापडले आहेत. हे मंदिर कुश नावाचे महाकाय राज्य अस्तित्वात होते तेव्हाचे असल्याचं बोललं जात आहे. सुदान हे तेव्हा इजिप्त आणि मध्यपूर्वेतील काही भाग या राज्यांतर्गत येत होते. मंदिराचे अवशेष हे जुन्या डोंगोला येथील मध्ययुगीन किल्ल्यामध्ये सापडले आहेत. आधुनिक सुदानमधील नाईल नदीच्या जवळ ते आढळले आहे. ज्यामध्ये मंदिराचे काही दगड आणि शिलालेखांचा समावेश आहे. युनिव्हर्सिटी ऑफ वॉर्सा येथील पोलिश सेंटर ऑफ मेडिटेरेनियन आर्कियोलॉजीच्या पुरातत्वशास्त्रज्ञांनी एका निवेदनात म्हटले आहे की हा शोध आश्चर्यकारक आहे, कारण जुन्या डोंगोला येथून 2,700 वर्षांहून जुने दुसरे अजून काहीही सापडले नाही.
मंदिरात कोणत्या देवता?
मंदिराच्या काही अवशेषांच्या आत, पुरातत्वशास्त्रज्ञांना शिलालेखांचे तुकडे सापडले आहेत. यापैकी एकानुसार हे मंदिर कावाच्या अमुन-रा चे होते.अमुन-रा ही कुश आणि इजिप्तमध्ये पूजा केली जाणारी देवता होती आणि कावा हे सुदानमधील एक पुरातत्व स्थळ आहे ज्यामध्ये एक मंदिर आहे. नुकतेच सापडलेले अवशेष त्याच मंदिराचे आहेत की अन्य कोणाचे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सुदानमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करणाऱ्या ज्युलिया बुडका यांनी लाइव्ह सायन्सला ईमेलमध्ये सांगितले की हा एक अतिशय महत्त्वाचा शोध आहे ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. जरी ज्युलिया मंदिराच्या अवशेषांच्या शोधाचा भाग नाही. पण मंदिराची नेमकी वेळ निश्चित करण्यासाठी आणखी संशोधनाची गरज असल्याचे त्यांचे मत आहे. जुना डोंगोला येथील मंदिर अस्तित्त्वात आहे का किंवा कावा किंवा इतर ठिकाणचे अवशेष येथे हलवण्यात आले आहेत असा प्रश्न देखील ते उपस्थित करतात.