ब्यूनस आयर्स : अर्जेंटिनाच्या (Argentina) उपराष्ट्रपती क्रिस्टिना फर्नांडिज (Cristina Fernández) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचं वृत्त आहे. उपराष्ट्रपती क्रिस्टिना घराच्याबाहेर लोकांना भेटत होत्या. त्यांच्याशी हस्तांदोलन करत होत्या. तेवढ्यात एका बंदुकधारीने त्यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाल्या. या हल्ल्यात क्रिस्टिना बालंबाल बचावल्या (Vice President Attack) आहेत. मात्र, उपराष्ट्रपतीच्या घराच्या परिसरात घुसून त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या बंदूकधारी व्यक्तिला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.
क्रिस्टिना गाडीतून उतरून आपल्या घराच्या आत जात होत्या. त्यावेळी त्या लोकांशी हस्तांदोलन करत होत्या. इतक्यात एक व्यक्ती पिस्तुल घेऊन आला. आणि अचानक त्याने क्रिस्टिना यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. त्याने अत्यंत जवळून क्रिस्टिना यांच्यावर गोळ्या झाडल्या. पण त्यात त्या थोडक्यात बचावल्या. पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखून या व्यक्तिच्या मुसक्या आवळल्या. या व्यक्तीची कसून चौकशी सुरू आहे.
या हल्ल्याचं एक फुटेज सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत हल्ला कसा झाला हे स्पष्ट दिसत आहे. क्रिस्टिना या लोकांना हस्तांदोलन करत गर्दीतून निघत असताना त्यांच्यावर एका व्यक्तीने पिस्तुल रोखल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर त्याने गोळी झाडताच सुरक्षा रक्षकांनी त्याच्या दिशेने धाव घेऊन त्याला ढकलले. त्यामुळे त्याचा निशाणा चुकला आणि क्रिस्टिना थोडक्यात बचावल्या. या व्यक्तिला अटक करण्यात आली आहे. हल्लेखोर ब्राझिलचा असल्याचं सांगितलं जात आहे.
क्रिस्टिना यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला आहे. त्या कोर्टातून घरी आल्या होत्या. त्याचवेळी ही घटना घडली. मीडिया रिपोर्टनुसार क्रिस्टिना यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. क्रिस्टिना या 2007 ते 2015 दरम्यान अर्जेंटिनाच्या राष्ट्रपती होत्या.
Insane video out of Argentina—a man points what appears to be a gun at embattled Vice President Cristina Fernández de Kirchner amid political chaos over corruption case against her. More here: https://t.co/nxn1Wgds1l pic.twitter.com/23spEVbAaY
— Conor Finnegan (@cjf39) September 2, 2022