अंतराळवीरांनी ब्रह्मांडातील ताऱ्यांच्या नर्सरीचा सुंदर नकाशा टिपला आहे (Universe Stellar Nurseries). या ठिकाणी अनेक नव्या ताऱ्यांचा जन्म होतो. (Photo Credit-ALMA)
या दुर्मिळ फोटोमुळे संपूर्ण ब्रह्मांडातील विविधतेची माहिती मिळते आहे. अंतराळवीरांनी 'अटाकामा लार्ज मिलीमीटर ऐरे' (ALMA) ऑब्जर्वेटरीच्या टेलिस्कोपच्या मदतीने या ताऱ्यांच्या नर्सरीचा फोटो टिपला आहे. (Photo Credit-ALMA)
ओहायो स्टेट यूनिव्हर्सिटीच्या पथकाच्या मते, "वैज्ञानिकांच्या या आधीच्या मतांच्या विरोधात ही ताऱ्यांची नर्सरी दिसते आहे. ही नर्सरी एकसारखी दिसत नाही आणि तिचं कामही एकसारखं नाही. माणसांच्या घरांप्रमाणेच या ताऱ्यांच्या नर्सरीत वेगळेपण आहे (Photo Credit-ALMA).
हा शोध ब्रह्मांडातील ताऱ्यांना जन्म देणाऱ्या अंधकारमय आणि धोकादायक ठिकाणांना समजून घेण्यातील मोठं यश आहे. त्यांचं आयुष्यमान कमी असतं. साधारणपणे त्यांचं जीवनमान 3 कोटी वर्षे आहे. (Photo Credit-ALMA)
मागील 5 वर्षात राष्ट्रीय रेडियो एस्ट्रोनॉमी ऑब्जर्वेटरीच्या पथकाने ब्रह्मांडात ताऱ्यांची निर्मिती होणाऱ्या भागाचं निरिक्षण केलंय. (Photo Credit-ALMA)
या पथकाने आपल्या आकाशगंगेच्या जवळ असलेल्या 90 आकाशगंगांमधील 1 लाखपेक्षा अधिक नर्सरींचा शोध लावलाय. (Photo Credit-ALMA)