माजी पंतप्रधानांच्या थेट कानशिलात लगावली, प्रचारादरम्यान घडली घटना

| Updated on: Dec 14, 2023 | 8:51 PM

नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना गुरुवारी एका व्यक्तीने कानशिलात लगावली. निवडणूक प्रचारादरम्यान जेव्हा कार्यकर्ते विरोधी पक्षनेते केपी शर्मा ओली यांना पुष्पहार अर्पण करत होते तेव्हा एका व्यक्तीने माजी पंतप्रधानांना कानशिलात लगावली.

माजी पंतप्रधानांच्या थेट कानशिलात लगावली, प्रचारादरम्यान घडली घटना
kp sharma
Follow us on

Nepal PM : नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना गुरुवारी एका व्यक्तीने कानशिलात मारली. निवडणूक प्रचारादरम्यान जेव्हा कार्यकर्ते विरोधी पक्षनेते केपी शर्मा ओली यांना पुष्पहार अर्पण करत होते तेव्हा एका व्यक्तीने माजी पंतप्रधानांच्या थेट कानाखाली लगावली. मात्र, तैनात असलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पकडले.

कोसी प्रांताचे पोलीस डीआयजी राजेशनाथ बास्तोला यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने आज प्रचार मोहिमेदरम्यान माजी पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते केपी शर्मा ओली यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

या व्यक्तीने हल्ला का केला. त्याचा उद्देश काय होता याबाबत पोलीस चौकशी करत आहे. पोलिसांनी सध्या या हल्लेखोराला ताब्यात घेतले असेून त्याची चौकशी केली जात आहे.

नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी अनेकदा भारताविरोधात वक्तव्य केले आहेत. ओली त्यांच्या भारतविरोधी वक्तव्यांसाठी ओळखले जातात.