कीव : युक्रेन आणि रशियामधील युद्ध (Russia Ukraine War) वाढत असून युक्रेनच्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला करण्यात आला आहे. तर किवमधील ऑईल डेपोवर रशियानं हल्ला केल्यानं पुन्हा एकदा संकटाचे ढग दाटून आले आहे. युक्रेनमधील वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरु असलेले मिसाईल हल्ले काही थांबायचं नाव घेत नाही आहे. यापूर्वी देखील रशियानं (Russia) युक्रेनमधील अनेक महत्वाच्या भागांना लक्ष्य केलं होतं. याआधी युक्रेनमधील पोलीस मुख्यालयावर रशियानं हल्ला केला होता. त्यामध्ये युक्रेनमधील पोलीस मुख्यालयाचं मोठ नुकसान झालं. आता पुन्हा युक्रेनच्या अणुर्ऊजा प्रकल्पावर रशियानं हल्ला केला आहे. तर ऑईल डेपोल देखील रशियानं लक्ष्य केलं आहे. युक्रेन (Ukraine) आणि रशियाच्या युद्धात एकीकडे बलाढ्य रशिया आहे तर दुसरीकडे रशियासमोर छोटा असला तरी ताकदीनं टक्कर देणारा युक्रेन आहे. जगभरात या युद्धाकडे तिसरे महायुद्ध म्हणून देखील पाहिले जात आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. युद्धाचा (War) 9वा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरूच असून, या युद्धामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्याप्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. दरम्यान, रशियन सैनिक युरोपमधील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प झापोरिझ्झिया एनपीपीला लक्ष करत असल्याचं युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री दिमिट्रो कुलेबा यांनी म्हटलं आहे. रशियन सैन्य युरोपमधील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प पोरिझ्झिया एनपीपीवर चारही बाजुने गोळीबार करत आहेत. रशियाच्या सैनिकांकडून युरोपमधील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या झापोरिझ्झियावर गोळीबार करण्यात आला. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाच्या प्रमुख सल्लागारांनी हा गोळीबाराचा व्हिडीओ ट्विट (twitter) केला आहे.
युक्रेनमध्ये रशिया घालत असलेला हैदोस आणि युक्रेनमधील शहरांमध्य होत असलेलं नुकसान पाहता जगभरातील इतर देशांनी रशियावर दबाव आणणं गरजेचं आहे. कारण, यापूर्वी देखील रशियानं युक्रेनमधील अनेक महत्वाच्या भागांना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर एका पाठोपाठ एक अशा महत्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करुन रशिया आपला दबदबा काय ठेऊ पाहतोय. मात्र, जगभरात रशियाची छबी कट्टर आणि हिंसक देश अशी होत असल्याचं जाणकार सांगतात. आता युक्रेनच्या अणुऊर्जा प्रकल्पावरील हल्ला असो वा कीवमधील ऑईल डेपोवर रशियानं केलेला हल्ला असो हे मिसाईल हल्ले केल्यानं युक्रेनला मोठ्या संकटाचा सामना करावा लागतोय. रशियाने युक्रेनमधील महत्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करत असल्यानं युक्रेनसमोरील संकटांचे ढग गडद होताना दिसतायेत..