कझाकिस्तानमध्ये बुधवारी रशियाला जाणारं अजरबैजान एअरलाइन्सच प्रवासी विमान कोसळलं. या दुर्देवी घटनेत 38 लोकांचा मृत्यू झाला. 29 लोक बचावले. या भयानक घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात विमान अपघातातून बचावलेल्या एका प्रवाशाचा व्हिडिओ आहे. विमानातील एका प्रवाशाने अपघातानंतर विमानात काय स्थिती होती, त्याचं व्हिडिओ रेकॉर्ड केलाय. या व्हिडिओमध्ये केबिनच्या आतमधील भीषण स्थिती दिसतेय. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी, तिथून बाहेर पडण्यासाठी प्रवासी जमिनीवर रांगताना दिसले. विमानाच्या आतमधले जे विजुअल आहेत, त्यात सीट पूर्णपणे तुटल्याच दिसतय. सगळं सामना इथे-तिथे विखरुन पडलेलं आहे.
अन्य एका व्हिडिओमध्ये विमानाला लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असल्याच दिसतय. आग विझवल्यानंतर काही प्रवासी बाहेर पडले. रेस्क्यू टीम विमानात अडकलेल्या अन्य प्रवाशांना बाहेर काढताना दिसतेय. विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगनंतर हा भीषण अपघात झाला. लँडिंगच्यावेळी विमानात आग लागली. विमानाचे दोन तुकडे झाले. अपघात इतका भयानक होता की, बऱ्याच दूर अंतरापर्यंत प्रवाशांचे मृतदेह विखुरलेले होते. जखमींचा मदतीसाठी आरडाओरडा सुरु होता.
A surviving passenger from the Aktau plane crash manages to capture footage of inside the cabin pic.twitter.com/shIblEmV1d
— RT (@RT_com) December 25, 2024
पाण्यातील माशांप्रमाणे हवेत विमान वर-खाली
अजरबैजान एअरलाइन्सच्या फ्लाइट एम्ब्रेयर E190AR ने बाकू एअरपोर्टवरुन स्थानिक वेळेनुसार 6.28 वाजता उड्डाण केलं होतं. प्लेनने उड्डाण केल्यानंतर तासाभराने रशियाच्या चेचन्या ग्रोन्जी एअरपोर्टवर लँड करणारं होतं. उड्डाणानंतर काही वेळातच या विमानाची एका पक्ष्याबरोबर धडक झाली. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये पाण्यातील माशांप्रमाणे हवेत विमान वर-खाली होताना दिसलं. फ्लाईट ट्रॅकिंग साइट्सने विमानाच्या मूवमेंटचा मॅप जारी केलाय. त्यात विमान हवेत असतानाच नियंत्रण गमावताना दिसतय.