Baba Vanga 2025 Prediction: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निवडणूक प्रचारसभेत रविवारी हल्ला झाला. हल्लेखोराने झाडलेली गोळी ट्रम्प यांच्या कानाला लागल्यामुळे ते बचावले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. ट्रम्प यांच्यावरील हल्लानंतर बाबा वेंगा चर्चेत आले. बाबा वेंगा यांची भविष्यवाणी शंभर टक्के सत्य ठरली आहे. त्यामुळे सर्व जगाला धक्का बसला आहे. कोण आहे बाबा वेंगा ज्यांची भविष्यवाणी खरी ठरली. त्यांनी ट्रम्प आणि जगासंदर्भात काय भविष्य वर्तवले होते.
ट्रम्प यांच्यावर रविवारी हल्ला झाल्यानंतर बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीची चर्चा सुरु झाली आहे. बाबा वेंगा यांनी आपल्या भविष्यवाणीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते. त्यांनी अमेरिकेच्या माजी राष्ट्रध्यक्षाचे जीवन धोक्यात असल्याचे भविष्य वर्तवले होते. त्यांनी 2025 पासून मानवतेचा विनाश सुरु होणार असल्याचे भविष्य वर्तवले आहे. यामुळे आता जग विनाशाच्या उंबरठ्यावर आली आहे का? अशी चर्चा सुरु झाली आहे. दुसऱ्या महायुद्धासंदर्भात त्यांनी वर्तवलेले भविष्य खरे ठरले होते.
बाबा वेंगा बुल्गारियामधील अंध फकीर आहे. त्यांचा जन्म 1911 मध्ये झाला. 12 वर्षी त्यांना अंधत्व आले. 1996 मध्ये त्यांचे निधन झाले. परंतु त्यापूर्वी त्यांनी शेकडो वर्षांची भविष्यवाणी केली. त्यांची भविष्यवाणी जिज्ञासा आणि चिंतेचा विषय ठरली आहे. त्यांनी व्लादिमीर पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते. तसेच ट्रम्प यांना रहस्यमय आजार होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माध्यमांमध्ये 2025 मधील भविष्यवाणीसंदर्भात अनेक दावे केले जात आहे. त्यानुसार, 2025 पासून जगाच्या विनाशाला सुरुवात होणार आहे. 9/11 हल्ला, कुर्स्क पनडुब्बी दुर्घटना यासंदर्भात बाबा बेंगा यांचे भविष्य खरे ठरले आहे.
मानवतेच्या विनाशाची सुरुवात सन 2025 मध्ये एका आपत्तीजनक घटनेने होईल, असे बाबा वेंगा यांनी म्हटले आहे. 2025 मध्येच युरोपमध्ये एक भयंकर संघर्ष सुरू होईल, ज्यामुळे मोठा विध्वंस होईल. त्यामुळे त्या ठिकाणीवरील लोकसंख्येवर या घटनेचा वाईट परिणाम होईल. बाबा वेंगा यांनी म्हटले आहे की, 2028 पर्यंत मानव शुक्रापासून ऊर्जा मिळविण्याचा प्रयत्न करतील. यानंतर 2033 मध्ये हवामानात मोठे बदल होणार आहेत. ध्रुवीय बर्फ वितळल्याने समुद्राची पातळी वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 2130 मध्ये मानवाचा एलियनशी संपर्क होणार असल्याचे बाबा वेंगा यांनी म्हटले आहे.