बाली : कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गामुळे जगभरातील लोकांचं जीवन धोक्यात आलं आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींचे व्यवसाय बंद झाले यामुळे प्रत्येकावर आर्थिक संकट कोसळलं आहे. अशात मुलांची शाळा आणि महाविद्यालयाची फी भरण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. हीच बाब लक्षात घेत बाली इथल्या एका महाविद्यालयाने या समस्येवर एक अभिनव उपाय शोधला आहे. हे महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून फी म्हणून नारळ घेत आहे. सोशल मीडियावर या अनोख्या पद्धतीची जोरदार चर्चा सुरू आहे तर नेटकऱ्यांनी याला चांगली पसंती दिली आहे. (bali college allows students to give coconuts instead of fees in corona pandemic)
बालीमधल्या एका महाविद्यालयाने आर्थिक अडचण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फी भरण्याचा एक वेगळा मार्ग निवडला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून फी म्हणून नारळ घेत आहे. होय, बालीच्या व्हिनस वन टुरिझम अॅकॅडमीने त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी हा पर्याय दिला आहे. जर विद्यार्थ्यांनी फी देणं शक्य नसेल तर त्याबदल्यात त्यांनी नारळ द्यायचा आहे.
कॉलेजच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘सगळ्यात आधी कॉलेजने विद्यार्थ्यांची फी हप्त्यांमध्ये घेण्यास सुरुवात केली आहे. पण कोरोनाच्या संकटात प्रत्येकावर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे. या कॉलेजची नारळाचं तेल तयार करण्याची कंपनी आहे. त्यामुळे फीच्या बदल्यात विद्यार्थींना नारळ देण्याचा पर्याय महाविद्यालयानं दिला आहे.
इतकंच नाही तर या कॉलेजने इतर नैसर्गिक उत्पादनंही फी म्हणून देण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना दिला आहे. यामध्ये हर्बल साबण तयार करण्यासाठी वापरली जाणारी इतर वनस्पतींची पानं असे पर्याय दिले आहे. यामध्ये विद्यार्थी त्यांच्या उत्पादनांची पुनर्विक्री देखील करून देऊ शकतात. कॉलेजचा हा अनोखा पर्याय सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे.
इतर बातम्या –
पेन्शनधारकांनो लक्ष द्या; ‘हे’ प्रमाणपत्रं जमा न केल्यास पेन्शन थांबणार!
US election 2020 : हँड सॅनिटायझरमुळे अमेरिकेच्या निवडणुकीत बॅलेट स्कॅनर झालं जाम, तासभर मतदान रखडलं
VIDEO : भारतीय वायुसेनेची ताकद वाढली, आणखी 3 ‘राफेल’ विमान भारतात दाखलhttps://t.co/b6Os0uIpXI
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 4, 2020
(bali college allows students to give coconuts instead of fees in corona pandemic)